Bigg Boss 17 Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17: 'हा' स्पर्धक ठरतोय सर्वांचे टार्गेट; बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनला सुरुवात

Bigg Boss 17: आता मन्नारा आणि बिग बॉसमध्ये काय बोलणे होणार हे ऐकण्याची आणि पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17'ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. 15 ऑक्टोबरला प्रीमियर झालेल्या या गेम शोमधील स्पर्धकांनी आता आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. आता या सीझनमधल्या पहिल्या नॉमिनेशनला सुरुवात झाली आहे. आता याचा प्रोमो रिलिज झाला असून बहुतेकजण मन्नाराला नॉमिनेट करताना दिसत आहेत.

बिग बॉस 17 च्या प्रोमोमध्ये, बिग बॉसने घोषणा केली की या सीझनच्या प्रथमच नामांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या दिल रुममध्ये मन्नारा राहत आहे तिथे सगळे मिळून मन्नाराला नॉमिनेट करतात. आपल्याच लोकांचा विश्वासघात पाहून मन्नारा रडताना दिसत आहे. त्यानंतर बिग बॉस तिला कन्फेशन रूममध्ये बोलावतात. आता मन्नारा आणि बिग बॉसमध्ये काय बोलणे होणार हे ऐकण्याची आणि पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांच्यातील वाद संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. पहिल्याच दिवशी एकमेकांवर तुटुन प़डणारे अभिषेक आणि ईशा पुन्हा एकदा भांडताना दिसणार आहेत. आता या भांडणात अनेकजण सामील होणार असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. एकंदरीत 'बिग बॉस 17' मध्ये पहिल्या दोन दिवसात बरीच मारामारी पाहायला मिळाली आहे.

आता बिग बॉसच्या( Bigg Boss ) १७ व्या सीझनला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. सर्व स्पर्धक एकमेकांवर भारी पडताना दिसत आहेत. आता कोण स्वत:ला सिद्ध करणार, कोण प्रेक्षकांच्या मनात आपली जागा तयार करणार आणि कोण खेळात ऊर्जा टिकवून ठेवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT