Bigg Boss 17  Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17 Grand Finale: ठरलं तर मग! 'या' दिवशी होणार बिग बॉसचा ग्रँड फिनाले, माधुरी दिक्षित ठरली कारणीभूत

Bigg Boss 17 Grand Finale: या वेळेत बिग बॉसचे एपिसोड पाहायला मिळत होते आणि म्हणूनच बिग बॉस शोचा ग्रँड फिनाले 28 जानेवारी रोजी प्रसारित होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17 Grand Finale: 'बिग बॉस 17' या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरु झाला होता आणि आता हा शो देखील पुढच्या महिन्यात संपणारदेखील आहे.

असे म्हटले जात होते की, शो आणखी काही दिवस चालू राहिल मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार 'बिग बॉस 17' जानेवारीमध्येच संपेल आणि डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने' त्याची जागा घेईल. 'बिग बॉस 17' चा ग्रँड फिनाले भाग 28 जानेवारीला प्रसारित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

चॅनेलच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने 'डान्स दिवाने'चा प्रोमो रिलीज करत , 'आता प्रत्येक वयाला एक स्टेज मिळेल, असे कॅप्शन दिले आहे. या प्रोमोमध्ये माधुरी दीक्षित डान्स रिअॅलिटी शो बद्दल सांगताना दिसत आहे.

या शोचा प्रीमियर वीकेंडला 3 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वाजता होईल. या वेळेत बिग बॉसचे एपिसोड पाहायला मिळत होते आणि म्हणूनच बिग बॉस शोचा ग्रँड फिनाले 28 जानेवारी रोजी प्रसारित होणार आहे.

या आठवड्यात वीकेंड का वार एपिसोडमध्ये ऐश्वर्या शर्माला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. हा निर्णय ईशा शर्माने घेतल्याने घरात वादावादीदेखील झाल्याचे पाहायला मिळाले. अंकिता लोखंडे, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट आणि अनुराग डोवाल यांना या आठवड्यात नॉमिनेट केले होते.

ग्रँड फिनालेने शोबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. 'बिग बॉस 17' 15 व्या आठवड्यात संपणार आहे. दरम्यान, यंदाची ट्रॉफी कोण आपल्या नावावर करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

SCROLL FOR NEXT