Bigg Boss 17  Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17: 'विकीने अंकिताला मारण्याचा प्रयत्न केला...' अभिषेक अन् अरुणने केले गंभीर आरोप

Bigg Boss 17: अंकिताने अभिषेकला असे गंभीर आरोप करू नको असे बजावल्याचेही दिसून आले.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: बिग बॉसचा १७ वा सीझन चांगलाच चर्चेत आहे. कधी ट्विस्ट, कधी गेम , कधी स्पर्धकांमधील भांडणे तर कधी खुद्ध बिग बॉसचा यू-टर्न यामुळे यंदाचा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

आता मात्र बिग बॉसच्या घरात एका भांडणने चांगलेच लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. काही सेंकदाची ही क्लीप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हे भांडण विकी जैन आणि अंकिता लोखंडे या जोडप्याचे आहे.

अभिषेक कुमार आणि अरुण मशेट्टी यांनी विकी जैनने पत्नी अंकिता लोखंडेला मारल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावरून विकी आणि अभिषेकमध्ये जोरदार वाद झाला. अंकिताने अभिषेकला असे गंभीर आरोप करू नको असे बजावल्याचेही दिसून आले.

अंकिताही काही सेकंद आश्चर्यचकित दिसली. अभिषेकने अनेक गंभीर आरोप केले. मात्र, विकीने ते मान्य केले नाही. अभिषेक म्हणाला, 'आपण आत्ताच काय पाहिलं? पत्नी अंकिता लोखंडे हिला मारण्याचा प्रयत्न केला नाही का? विकी जैन त्याच्या पत्नीला मारहाण करतो. अंकिता लोखंडेला त्याने मारले. अरुण भाई सर्वांना सांगा. यावर विकी म्हणाला, 'मी रागाच्या भरात माझे ब्लँकेट बाजूला ठेवले होते, एवढे मोठे आरोप करणे बंद करा, हा विनोद नाही.'

हे सर्व पाहणाऱ्या अंकिताने आपल्या पती विकी जैनचा बचाव केला. अभिषेक आधी तू स्वत:ला बघ, तू स्वतः मुलींना मारहाण करतो आणि आमच्यावर आरोप होतो. एवढी मोठी गोष्ट नॅशनल टिव्हीवर कसे बोलत आहेस. हा सगळा विनोद आहे असे तुम्हाला वाटते का? मी सांगणार आहे म्हणून हे सर्व बोलण्यापूर्वी दोनदा विचार करा.

यानंतर विकीने अंकिताला शांत केले आणि म्हणाला, 'त्याला गोष्टी समजावून सांगणे बंद कर, त्याला काही समजत नाही आणि त्याला जे हवे ते तो बोलतो.' अभिषेक कुमारच्या लक्षात आले की त्याने हे प्रकरण लांबवू नये. अंकिताला सांगितले की तो मुद्दा पुन्हा उपस्थित करणार नाही. या एपिसोडमध्ये जवळच्या मैत्रिणी मन्नारा चोप्रा आणि मुनावर फारुकी यांच्यात जोरदार भांडणही पाहायला मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT