Bigg Boss OTT 2 Finale Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss OTT 2 Finale : एल्विश यादवने जिंकली बिग बॉस ओटीटीची ट्रॉफी...पण सलमानचीच सोशल मिडीयावर चर्चा

गेल्या कित्येक काळापासुन चर्चेत आणि वादात अडकलेला बिग बॉस ओटीटीचा विनर जाहीर झाला आहे, एल्विश यादवने यावेळची ट्रॉफी जिंकली आहे.

Rahul sadolikar

Elvish Yadav wins Bigg Boss OTT 2 : बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता मिळाला आहे. आठवडाभराच्या संघर्षानंतर अखेर रावसाहेब म्हणजेच एल्विश यादवने ट्रॉफी जिंकली. बिग बॉस OTT 2 च्या ग्रँड फिनालेमध्ये, होस्ट सलमान खानने हात वर करून एल्विश यादवला विजेता घोषित केले.

मिडीयाचे प्रश्न एल्विशची उत्तरं

आता हा शो जिंकल्यानंतर एल्विशला मीडियाने घेरले आहे. यादरम्यान, त्याने शोमध्ये सलमान खानच्या वृत्तीबद्दल आणि स्पर्धकांसोबत भेदभाव केला की नाही याबद्दलही सांगितले आहे.

खरं तर, बिग बॉस ओटीटी 2 दरम्यान, प्रेक्षकांनी सलमान खानवर अनेक वेळा पक्षपाताचा आरोप केला. आता या विषयावर पिंकविलाशी बोलताना एल्विश यादवने खंडन करत सलमान अजिबात पक्षपाती नसल्याचे सांगितले.

अफवांबद्दल एल्विश म्हणाला

सलमान खानकडून भेदभाव केला जात असल्याबद्दल बोलताना एल्विशने विनोद केला की, "हो, तो पक्षपाती होता, पण फक्त माझ्यासाठी." अफवांना पूर्णविराम देत, एल्विश पुढे म्हणाला, "तो नव्हता, माझा मित्र. तो खूप चांगला आहे. जर एखादी गोष्ट असेल तर ती आहे. जर अशी गोष्ट नसेल तर नाही म्हणुन सांगायला हवं."

बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीने विनर

एल्विश यादव सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तो एक प्रसिद्ध YouTuber आहे. बिग बॉस ओटीटी सीझन 2 मध्ये, त्याने शो सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. आता तो या शोचा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या इतिहासात वाइल्ड कार्ड एंट्रीने बिग बॉस ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.  

हे ठरले उपविजेते

बिग बॉस OTT सीझन 2 च्या ग्रँड फिनालेपर्यंत फक्त पाच स्पर्धकांना त्यांचा प्रवास पूर्ण करता आला . एल्विश यादवसोबतच्या अंतिम फेरीत अभिषेक मल्हान, मनीषा राणी, पूजा भट्ट आणि बाबिका धुर्वे यांचा समावेश होता. तथापि, अभिषेक आणि एल्विशने टॉप 2 मध्ये स्थान मिळवले. यासोबतच एल्विशने विजेतेपद पटकावले आणि अभिषेक प्रथम उपविजेता ठरला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT