Bidisha De Majumdar Dainik Gomantak
मनोरंजन

बंगाली अभिनेत्री बिदिशा दे मजुमदारने केली आत्महत्या

प्रियकरासोबतच्या बिघडलेल्या नात्यामुळे बिदिशा होती नाराज

दैनिक गोमन्तक

बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिने 15 मे रोजी सकाळी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याला अवघे 10 दिवस होत नाहीत तोपर्यंत पुन्हा 21 वर्षीय लोकप्रिय बंगाली टीव्ही अभिनेत्री बिदिशा दे मजुमदार हिने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यामूळे बंगाली सिनेक्षेत्राला दूसरा धक्का बसला आहे. बिदिशाने 25 मे रोजी संध्याकाळी मृत्यूला कवटाळले आहे. मिळालेल्या माहितीनूसार प्रियकरासोबतच्या बिघडलेल्या नात्यामुळे बिदिशाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. (Bengali actress Bidisha De Majumdar commits suicide )

मॉडेल बिदिशा हिचा मृतदेह दम दम नगरबाजार येथील भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. बिदिशा दीड महिन्यापूर्वीच या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बिदिशाच्या अपार्टमेंटमधून एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. बिदिशाचे कुटुंबीय आणि तिच्या मित्रांनी सांगितले की, त्यांच्या नात्यात काही समस्या निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले. नवोदित मॉडेल आणि अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या बातमीने बंगाली इंडस्ट्रीत सर्वांनाच धक्का बसला आहे.

अभिनेत्रीच्या एका जवळच्या मित्राने बिदिशामध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय घेऊन स्थानिक पोलिसांना फोन केला होता. त्यांना फोन केल्यानंतर पोलिस अपार्टमेंटमध्ये पोहोचले आणि अभिनेत्रीला लटकलेल्या अवस्थेत दिसले, त्यानंतर त्यांना फ्लॅटचा दरवाजा तोडावा लागला. वृत्तानुसार, पोलिसांनी एक सुसाइड नोट देखील जप्त केली आहे ज्यामध्ये बिदिशाने तिच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरले नाही.

प्रियकरासोबतच्या नात्यामुळे ती त्रस्त होती

अभिनेत्री एका जिम ट्रेनरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या नात्यात काहीही चांगले चालत नव्हते, त्यामुळे बिदिशा खूप नाराज होती. बिदिशाचा बॉयफ्रेंड तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहूनही अनेक मुलींना डेट करत होता. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. बिदिशाच्या जवळच्या मैत्रिणीने याबद्दल सांगितले की, अभिनेत्रीने तिच्या बिघडत चाललेल्या नात्याबद्दलही तिच्याशी बोलले. मात्र, बिदिशाला तिच्या व्यावसायिक आयुष्यात कोणतीही अडचण आली नाही. कारण त्याला सतत काम मिळत होते. पण, त्यांच्या नात्यामुळे ती त्रस्त होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT