Nusrat Jahan Dainik Gomantak
मनोरंजन

बंगालच्या TMC खासदार नुसरत जहाँचा बोल्ड डान्स सोशल मिडियावर घालतोय धूमाकूळ

तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) खासदार आणि लोकप्रिय बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

दैनिक गोमन्तक

तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) खासदार आणि लोकप्रिय बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुसरत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्याच बरोबर तिची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. तिची कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर येताच व्हायरल होते. नुसरतने (Nusrat Jahan) अभिनयासोबतच राजकारणातही नाव कमावले आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना आश्चर्यचकित करते. त्याचवेळी तिचा हा नवीन डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) धूमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये नुसरत 'मयुरी' बनून तिची अदाकारी दाखवत आहे.

खरंतर, शुक्रवारी नुसरत जहाँने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर तिच्या आगामी 'नच मयुरी नाच...' या गाण्याचा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचे ग्लॅमर बनवले जात आहे. यात तिची ग्लॅमरस शैली पाहण्यासारखी आहे. 'नच मयुरी नाच...' गाण्याच्या या व्हिडिओमध्ये ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, अनेक ठिकाणी तिच्या ड्रेसवर मोराची पिसे आहेत, जी या गाण्याच्या बोलांशी जुळत आहेत.

शिवाय, नाच मयुरी नाच...' गाण्याचा हा टीझर व्हिडिओ शेअर करताना नुसरत जहाँने कॅप्शनमध्ये लिहिले, 'लवकरच येत आहे!! नाच मयुरी नृत्य. हे गाणे कौशिक हुसैन तपोश यांनी संगीतबद्ध केले आहे. त्याच वेळी, तपोशने स्वत: या गाण्याचे बोलही लिहिले आहेत. नुसरतच्या या पोस्टला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. आत्तापर्यंत या गाण्याने सोशल मिडियावर धूमाकूळ घातला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT