Barkha Bisht Divorce Dainik Gomantak
मनोरंजन

Barkha Bisht Divorce : "आमचा लवकरच डिव्होर्स होईल" या अभिनेत्रीने चाहत्यांना दिला धक्का

अभिनेत्री बरखा बिश्तने आपल्या घटस्फोटाची बातमी देत चाहत्यांना धक्का दिला आहे.

Rahul sadolikar

अभिनेत्री बरखा बिश्तने चाहत्यांना एक धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बरखा पती इंद्रनीलला लवकरच घटस्फोट देणार आहे. मार्च 2008 मध्ये लग्न झालेले इंद्रनील सेनगुप्ता आणि बरखा बिश्त गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार त्यांचा घटस्फोट लवकरच होण्याची शक्यता आहे. माध्यमांनी बरखाकडे संपर्क साधला तेव्हा ती म्हणाली, “हो, आमचा घटस्फोट लवकर झाला पाहिजे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक आहे.”

इंद्रनील आणि बरखा 2006 मध्ये प्यार के दो नाम...एक राधा एक श्यामच्या सेटवर भेटले. तिथेच ते प्रेमात पडले आणि दोन वर्षांनंतर त्यांनी लग्न केले.

त्यांना मीरा ही 11 वर्षांची मुलगी आहे. जून २०२१ मध्ये त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याच्या बातम्या आल्या तेव्हा त्यांचे मित्र आणि सहकाऱ्यांना धक्का बसला होता.

बरखाने विभक्त होण्यामागील कारणांवर बोलण्यास नकार दिला, परंतु तिने तिची मुलगी आणि काम हेच तिच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगितलं आहे. ती म्हणाली, “मी सिंगल मदर आहे आणि मीरा ही माझी प्राथमिकता आहे. कामाच्या बाबतीत, मी OTT वर काही प्रोजेक्ट करत आहे. मी टीव्ही आणि चित्रपटांमध्येही चांगल्या प्रोजेक्टची तयारी करत आहे .”

बरखाने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अलीकडेच शादी मुबारक, 'परमावतार श्री कृष्णा'त काम केले आहे आणि राम लीला आणि खलनायक सारख्या चित्रपटांचाही ती महत्त्वाचा भाग आहे. तर इंद्रनील निमकी मुखिया आणि श्रीमद भागवत पुराण सारख्या कार्यक्रमांचा भाग आहे आणि गेल्या काही वर्षांपासून बंगाली चित्रपटांमध्ये काम करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT