Bappi Lahiri had chosen actor ranveer singh for his biopic RanveerSingh/Instagram
मनोरंजन

बप्पी लहरींनी त्यांच्या बायोपिकसाठी 'या' अभिनेत्याची केली होती निवड

रणवीर सिंहने (Ranveer Singh) त्यांच्या बायोपिकमध्ये काम करावे, अशी इच्छा बप्पी लहरींनी व्यक्त केली होती.

दैनिक गोमन्तक

Bappi Lahiri Biopic: आपल्या संगीत सृष्टीला अनेक बहारदार गायक लाभले आहेत. त्यातील मध्यंतरीच्या काळात गानकोकिळा लता मंगेशकर आणि प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचे 16 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. बप्पी लहरी हे त्यांच्या गाण्यांबरोबरच कपडे आणि सोन्याच्या दागिन्यांबद्दल असणाऱ्या आवडीसाठीही चर्चेत असायचे. बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक पुरस्कार जिंकले होते. त्यांच्या संगीत जगतातील कारकिर्दीवर लवकरच बायोपिक बनवला जाणार आहे. बप्पी लहरी यांचा मुलगा बाप्पा लहरी यांनी याबाबतची माहिती सर्वांना दिली आहे. (Bappi Lahiri had chosen actor Ranveer Singh for his biopic)

जर माझ्या वडिलांवर चित्रपटाची निर्मिती झाली तर त्यांची भूमिका ही अभिनेता रणवीर सिंहने साकारावी, अशी त्यांची नेहमी इच्छा होती. रणवीर सिंहने (Ranveer Singh) त्यांच्या बायोपिकमध्ये काम करावे, असे त्यांना वाटायचे.

काही वर्षांपूर्वी आम्ही याबाबत चर्चा केली होती. त्यावेळी आम्ही अनेक निर्मात्यांशीही बोललो होतो. माझ्या वडिलांचे रणवीरवर प्रचंड प्रेम होते. त्यांना तो प्रचंड आवडायचा. त्यामुळे रणवीर सिंहने त्यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारावी, अशी त्यांची इच्छा होती, असे मत बप्पी लहरी यांच्या मुलाने व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT