Asha Bhosale Dainik Gomantak
मनोरंजन

Asha Bhosle Got Maharashtra Bhushan : आशा भोसले यांना यंदाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार...

गायिका आशा भोसले यांना 24 मार्च रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे.

Rahul sadolikar

जगभरातल्या प्रेक्षकांना आपल्या मखमली आवाजाने आणि आपल्या अष्टपैलू कामगिरीने भुरळ घालणाऱ्या आशा भोसले यांना महाराष्ट्र सरकार सन्मानित करणार आहे. पद्मविभूषण श्रीमती आशाताई भोसले यांना शुक्रवारी 24 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता भव्यदिव्य सोहळ्यात राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अश्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरविण्यात येते. सन 2021 या वर्षीच्या पुरस्कार श्रीमती आशा भोसले यांना जाहीर झाला. तो पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते प्रदान केला जाईल.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, विधान सभा अध्यक्ष अँड.श्री राहूल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री, श्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई जिल्हयाचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत

विविध छटा असलेली अनेक प्रकारची गाणी अजरामर करणाऱ्या श्रीमती आशा भोसले यांचा जन्म 1933 साली झाला. संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांनी लहानपणापासूनच गाण्याची आवड होती.

आशा भोसले यांची कारकीर्द सुरू झाली 1943 साली. त्यानंतर 1948 मध्ये त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनी बॉलीवूडमध्ये सात दशकं अधिराज्य गाजवलंय. बॉलीवूडध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी प्ले-बॅक सिंगर म्हणून आवाज दिला आहे

बॉलीवूडमध्ये आशाताईंना 'मेलडी क्वीन' म्हणून ओळखलं जातं.आशा ताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. आशा भोसले, 1943 पासून या क्षेत्रात आहेत. ज्यात त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

Thivim MIT University: थिवी विद्यापीठासाठी 1 हजार 149 झाडे तोडणार, गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरी

Delhi Crime: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक! मुलानेच आईवर केला दोनदा बलात्कार; म्हणाला, ‘मी तिला शिक्षा दिली...’

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT