Ranbir Alia Wedding Gift Dainik Gomantak
मनोरंजन

Ranbir Alia Wedding: एनजीओने आलीया-रणबीरला दिलेले गिफ्ट पाहून नेटकऱ्यांनी घातली तोंडात बोटं

रणबीर आणि आलियाने लग्नात घोड्यांचा वापर केला नाही, म्हणून लग्नाची भेट देण्यासाठी अॅनिमल वेल्फेअर एनजीओने घोडीचे नाव आलिया आणि घोड्याचे नाव रणबीर असे ठेवले आहे.

दैनिक गोमन्तक

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी 14 एप्रिल रोजी लग्न गाठ बांधली. दोघांच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर सध्या बोलबाला आहे. सगळीकडे फक्त दोघांचीच चर्चा सूरू आहे. दरम्यान, एक बातमी समोर आली जी ऐकून आलिया आणि रणबीर देखील खूश होणार या वर शंकाच नाही. जरी अनेक चाहत्यांनी आणि ब्रँड्सनी दोघांनाही मनोरंजक पद्धतीने शुभेच्छा दिल्या असल्या तरी, आलिया आणि रणबीरने त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने एनिमल वेलफेयर त्या दोघांनी दिलेल्या शुभेच्छा तुमचे मन जिंकुन टाकेल. एवढेच नाही तर पूजा भट्टनेही यासाठी एनजीओचे आभारही मानले आहेत. (As a wedding gift Animal Welfare NGO has named the horse Alia and the horse Ranbir)

वास्तविक, घोडे आणि घोडी बहुतेक वेळा लग्नसमारंभात वापरली जातात, वर मिरवणूक घेऊन वधूला घेण्यासाठी जात असतो. रणबीर आणि आलियाने लग्नात हे केले नाही आणि त्यामुळे तिचे कौतुक करण्यासाठी आणि तिला लग्नाची भेट देण्यासाठी अॅनिमल वेल्फेअर एनजीओने घोडीचे नाव आलिया आणि घोड्याचे नाव रणबीर असे ठेवले आहे. दोन्ही घोडे (horse) शुभ्र पांढऱ्या रंगाचे आहेत. या घोड्यांचे वर्णन करताना कल्याणच्या एका सदस्याने सांगितले की, त्या घोडीटे नाव आलिया आहे, ती अत्यंत वाईट अवस्थेत सापडली होती. अनेक विवाहसोहळ्यांमध्ये याचा वापर केला जात असतो. ती अशक्त होती आणि तिला अनेक जखमा देखील झाल्या होत्या.

तर रणबीर नावाचा घोडा गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून त्याची सुटका करण्यात आली आहे. तिथल्या मालाची उचल करण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. त्याच्या चारही पायाला सूज आली होती, दोन्ही घोडे आता एनिमल राहत अभयारण्यात वास्तव्यास असून तेथे त्यांची पुर्णपणे काळजी घेतली जात आहे.

याविषयी माहिती देताना एनजीओने लिहिले आहे की, 'बॉलिवूडचे पॉवर कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांचे लग्न घोडेमुक्त केले आहे. यातून त्यांची चांगली विचारसरणी दिसून आली आहे. या उदात्त हेतूसाठी एनिमल राहतने आपल्या दोन घोड्यांची नावं रणबीर आणि आलिया ठेवले आहेत. पूजा भट्ट याबद्दल खूप आनंदी आहे आणि तिने लिहिले की, हे खूप छान आहे ज्याने आनंद होत आहे.

रणबीर आणि आलियाच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर, दोघांनी 2017 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर ब्रह्मास्त्र चित्रपटादरम्यान दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले, 2018 मध्ये दोघांनीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली आणि आता 2022 मध्ये दोघांनी लग्न केले आहे. आता ब्रह्मास्त्र हे दोन्ही चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT