Happy Birthday Malaika Arora Dainik Gomantak
मनोरंजन

'हॅपी बर्थडे बेबी...' म्हणत खास अंदाजमध्ये अर्जुन कपूरने दिल्या मलायका अरोराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Malaika Arora: अर्जुन कपूरने त्याची लेडी लव्ह मलाइकाला रोमँटिक अंदाजमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आज म्हणजेच 23 ऑक्टोबरला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. 49 वर्षांची मलायका बी-टाऊनमधील सर्वात सुंदर आणि अप्रतिम डान्सर्सपैकी एक आहे. मलायका अरोराच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरील सर्व चित्रपटातील व्यक्ती आणि चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार अर्जुन कपूरनेही त्याची प्रेमिका मलायका अरोरा हिला तिच्या वाढदिवसानिमित्त रोमँटिक पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) त्याची लेडी लव्ह मलाइकाला रोमँटिक अंदाजमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुन कपूरने रात्री उशिरा इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचा एक गोंडस फोटो दिसत आहे. या  मिरर सेल्फीमध्ये दोघे कपल खूपच क्यूट दिसत आहेत.

या फोटोच्या (Photo) खाली त्याने लिहिले की, 'यिन टू माय यांग, हॅपी बर्थडे बेबी, फक्त तूच राहा, नेहमी आनंदी राहा. अशाप्रकारे मलायका अरोराच्या वाढदिवसानिमित्त (Birthday Special) अर्जुन कपूरने प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर मलायका आणि अर्जुनचे सर्व चाहते सोशल मीडियावर (Social Media) या पोस्टला लाईक आणि कमेंट करत आहेत. तसेच मलायका अरोराला तिच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

मलायका-अर्जुन हे बी-टाऊनचे आवडते कपल
तिच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओमुळे मलायका अरोरा लाइमलाइटचा भाग बनली आहे. पण बहुतेक प्रसंगी मलायकाचे नाव अर्जुन कपूरबद्दल चर्चेत असते. हे कपल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बी-टाऊनच्या सर्वात आवडत्या कपलबद्दल बोलायचं झाले तर अर्जुन आणि मलायकाचे नाव त्यात नक्कीच सामील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT