Arjun Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Arjun Kapoor: अर्जूनने नवीन वर्षाची केली हटके सुरुवात

Arjun Kapoor: ज्यामध्ये लोक टॅटू बनवणाऱ्या मुलीचे कौतुक करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Arjun Kapoor: बॉलीवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता अर्जून कपूर कोणत्या चित्रपटामुळे नाही तर त्याने काढलेल्या टॅटूमुळे चर्चेत आला आहे.

अर्जुन कपूरने नव्या वर्षाची सुरुवात स्वत:मध्ये एका नव्या बदलाने केली आहे. '2 स्टेट्स', 'इशकजादे' आणि 'मुबारका' सारखे सिनेमे केलेल्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने नवीन वर्षाचे स्वागत थोडे हटके केले आहे. त्याच्या पायाच्या मागच्या बाजूला त्याने एक नवीन टॅटू काढला आहे. या टॅटूमध्ये 'राईज' असे लिहिले आहे.

अर्जूनने मंगळवारी त्याच्या इंस्टाग्रामवर टॅटू डिझाइनचा एक व्हिडिओ शेअर केला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आपण जे होतो त्याच्या राखेतूनच आपण ते बनू शकतो जे बनायचे आहे.' यासह, त्याने काही हॅशटॅग देखील वापरले आहेत ज्यात #RisingFromTheAshes #Inked #2024 असे आहे.

टॅटू व्हिडिओ झाला चांगलाच व्हायरल

अर्जुनचा हा टॅटू व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेता अभिषेक बच्चनने त्याच्या व्हिडिओ पोस्टवर हात वर करत इमोजीसह प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया यूजर्सनीही या टॅटूवर कमेंट केल्या आहेत. लोकांनी लिहिले आहे - भव्य टॅटू. अर्जुनचा हा टॅटू लोकांना खूप आवडला असून त्यांनी या पोस्टवर हार्ट इमोजी आणि फायर इमोजी शेअर केले आहेत. यासोबतच या पोस्टवर अनेक कमेंट्स आहेत ज्यामध्ये लोक टॅटू बनवणाऱ्या मुलीचे कौतुक करत आहेत.

अर्जून भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीतसोबत दिसणार

अर्जुन यापूर्वी 'कुत्ते' या कॉमेडी चित्रपटात दिसला होता. तो लवकरच एका रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे, ज्यात अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग यांच्या सहकलाकार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT