Arbaaz Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Arbaaz Khan Wedding: अन् बहिणीच्या घरी अरबाजने आटोपलं दुसरं लग्न; पोस्ट शेअर करत म्हणाला...

Arbaaz Khan Wedding: या लग्नाला अरबाज खानच्या कुटुंबाव्यतिरिक्त इंडस्ट्रीतील अनेक मित्र आणि जवळचे लोक उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

Arbaaz Khan Wedding: गेल्या काही दिवसांपासून बॉलीवू़ड अभिनेता अरबाज खान दुसरे लग्न करणार असल्याच्या चर्चां मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. मात्र अरबाज किंवा त्याची गर्लफ्रेंड शौराने कोणतेही वक्तव्य केले नव्हते. मात्र काल रात्री दोघांनी लग्न केले. बहीण अर्पिताच्या घरी हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर जवळपास 6 वर्षांनी शौरा अरबाजच्या आयुष्यात त्याची दुसरी पत्नी म्हणून आली आहे. या लग्नाला अरबाज खानच्या कुटुंबाव्यतिरिक्त इंडस्ट्रीतील अनेक मित्र आणि जवळचे लोक उपस्थित होते. आता अरबाज आणि शौराने सोशल मिडियावर फोटो पोस्ट करत त्यांच्या लग्नाची झलक दाखवली आहे.

अरबाज आणि शूराच्या या पोस्टवर त्यांच्या मित्रांनी आणि जवळच्या लोकांनी त्यांना अनेक शुभेच्छा दिल्या आहेत आणि या जोडप्याला आशीर्वादही दिले आहेत.

शौराआधी आणि मलायका नंतर जॉर्जिया एंड्रियानी अरबाजच्या आयुष्यात बराच काळ राहिली. असे म्हटले जात होते की दोघे डेट करत आहेत आणि ते लग्न करणार आहेत. पण अचानक अरबाजच्या आयुष्यात शुराची एन्ट्री झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

अरबाज खानने लग्नाचे फोटो पोस्ट करताना म्हटले आहे की, आजपासून आम्ही कायमसाठी एकत्र आहोत. तुमचे प्रेम आणि आशिर्वाद असेच कायम असू दे. त्याच्या लग्नात अरबाजचा मुलगा देखील दिसून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT