Malaika Arora and Arbaaz Khan Divorce  Dainik Gomantak
मनोरंजन

Arbaaz khan-Malaika Arora: शूरा खानसोबत लग्न होताच अरबाजने सोशल मिडियावर मलायकाला केले अनफॉलो; चर्चांना उधाण

Arbaaz khan-Malaika Arora: अरबाजने मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते, पण काही काळानंतर तो पुन्हा तिला फॉलो करायला लागला.

दैनिक गोमन्तक

Arbaaz khan-Malaika Arora: अरबाज खानने नुकतेच शूरा खानसोबत लग्नगाठ बांधली. हे त्यांचे दुसरे लग्न होते. दरम्यान, अरबाजने मलायका अरोराला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे म्हटले जात आहे. अरबाज आणि मलायकाचे 2016 मध्ये 18 वर्षांचे त्यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले होते.

मलायकासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजने जॉर्जिया एंड्रियानीला डेट करायला सुरुवात केली. पण वर्षभरापूर्वी त्याचे ब्रेकअपही झाले होते. काही दिवसांपूर्वीच अरबाजने शूरा खानसोबत आपली बहीण अर्पिताच्या घरी लग्नगाठ बांधली होती.

शुरा खानसोबतच्या लग्नानंतर अरबाज खान त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे, पण त्याने मलायका अरोराला अनफॉलो केल्याचे म्हटले जात आहे. इन्स्टाग्रामवर तो ज्या लोकांना फॉलो करत आहे त्यांना सर्च केल्यावर मलायकाचे नाव कुठेच सापडले नाही. असे असले तरीही मलायकाच्या फॉलोअर्सच्या यादीत अरबाजचे नाव अजूनही आहे. काही महिन्यांपूर्वी अरबाज आणि मलायका मुलगा अरहानसोबत हँगआउट करताना दिसले होते.

अरबाज खान इंस्टाग्रामवर एकूण 127 लोकांना फॉलो करत आहे, ज्यात भाऊ सलमान आणि सोहेल खान, मुलगा अरहान, फराह खान आणि करिश्मा कपूर यांची नावे आहेत. 'मिड डे'च्या वृत्तानुसार, अरबाजने मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते, पण काही काळानंतर तो पुन्हा तिला फॉलो करायला लागला.

अरबाज आणि मलायका 1998 मध्ये विवाहबद्ध झाले. मलायकाने घटस्फोटानंतर काही वर्षांनी अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली आणि ती त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता मलायकादेखील अरबाजला अनफॉलो करणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उठताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT