Arbaaz Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Arbaaz Khan: अरबाज खान दुसरं लग्न कधी करणार?

Arbaaz Khan: मात्र, आतापर्यंत अरबाज आणि शौरा यांनी रिलेशनशिप आणि लग्नाबाबत कोणतेही वक्तव्य दिलेले नाही.

दैनिक गोमन्तक

Arbaaz Khan: बॉलीवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. मग त्यांच्या चित्रपटामुळे असो किंवा त्यांच्या वक्तव्यामुळे किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे कलाकार नेहमीच चर्चेत असतात.

आता अरबाज खान आपल्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. तो त्याची गर्लफ्रेंड शौरा खानशी लग्न करू शकतो, अशा गप्पा सतत सुरू असतात दोघेही २४ डिसेंबरला लग्न करणार असल्याच्या बातम्याही चर्चेत आहेत. आता या सगळ्या गॉसिप्सवर अरबाज खाननेच प्रतिक्रिया दिली आहे. नुकताच त्याने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. जिथे पापाराझींनी अरबाज खानला लग्नाच्या ठिकाणाबाबत प्रश्न विचारला.

मुंबईत झालेल्या उमंग 2023 कार्यक्रमात अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. दीपिका पदुकोण, शाहरुख खान, सलमान खान, कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, बॉबी देओल, रणवीर सिंग, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन आणि शहनाज गिल यांसारखे स्टार्स या कार्यक्रमात दिसले.

या कार्यक्रमात अरबाज खानही उपस्थित होता. रेड कार्पेटवर पोज देण्यासाठी येताच पापाराझींनी उद्या किती वाजता आणि कुठे येणार अशी विचारणा सुरू केली. त्यानंतर अभिनेता लाजू लागला आणि 'अ‍ॅनिमल'च्या बॉबी देओलची पोज रिपीट करू लागला. जिथे तो पापाराझींना शांत करताना दिसला.

मिळालेल्या माहितीनुसार, शौरा खान आणि अरबाज खान त्यांच्या आगामी 'पटना शुक्ला' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. मात्र, आतापर्यंत अरबाज आणि शौरा यांनी रिलेशनशिप आणि लग्नाबाबत कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. मात्र, शौरा खानपूर्वी अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघेही बराच काळ सोबत होते पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT