Anupam Mittal in Hospital  Dainik Gomantak
मनोरंजन

Anupam Mittal in Hospital: शार्क टॅंक अनुपम मित्तल हॉस्पिटलमध्ये? व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

शार्क टॅंक अनुपम मित्तल सध्या हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती त्यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करुन दिली आहे.

Rahul sadolikar

Anupam Mittal in Hospital: 'Shark Tank India 2' टेलिव्हिजनवर आल्यापासून हेडलाइन बनत आहे. यात काही शंका नाही की सर्व शार्कने आता मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग मिळवले आहे आणि त्यांचे चाहते त्यांचे वैयक्तिक जीवन, आवडी आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 

अनुपम मित्तल हा या शोच्या शार्कपैकी एक असून शोच्या लोकप्रियतेमुळे तो आता एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. 

मित्तल हे पीपल ग्रुपचे मालक आहेत आणि लोकप्रिय प्लॅटफॉर्म Shaadi.com चे संस्थापक आहेत. या व्यतिरिक्त, तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या चाहत्यांची संख्याही खूप आहे. नुकतेच अनुपमने शस्त्रक्रिया केल्याचं त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अनुपम मित्तल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करताना नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितलं आहे. व्हिडिओमध्ये, आपण त्याला हॉस्पिटलच्या बेडवर त्याच्या हाताला सपोर्ट बँडमध्ये गुंडाळलेले बघू शकतो. 

व्हिडिओसोबत त्याने लिहिले की, 'जेव्हा मजला दूर जातो. अडथळे आणि नॉकआउट्सबद्दल आपण काही करू शकत नाही परंतु आपण काय करू शकतो… पुन्हा उठणे.

त्याने व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये काळजी व्यक्त करणाऱ्या कमेंटसचा वर्षाव केला. एका युजरने लिहिले 'मला वाटले शार्कला हाडे नसतात', तर एका फॅनने 'शार्क माणसांपेक्षा लवकर बरे होतात' अशी कमेंट केली. एक युजर लिहितो तुम्ही लवकरच उठून चालू व्हाल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT