Dainik Gomantak
मनोरंजन

Anek Trailer Out: 'Anek' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना दबंग स्टाईलमध्ये

ट्रेलरमध्ये आयुष्मान दमदार अभिनयामध्ये प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) त्याच्या चित्रपटांमधून प्रत्येक वेळी प्रेक्षकांसाठी काहीतरी खास घेऊन येतो. आयुष्मान खुराना आणखी एका नवीन चित्रपटासह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयुष्मान लवकरच त्याच्या आगामी 'अनेक' (Anek) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना एका गुप्त पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये आयुष्मानचा नवा लूक पाहायला मिळत आहे. ट्रेलरमधील त्याचा दमदार अभिनय आणि दमदार संवाद पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहेत. त्याच्या 'आर्टिकल 15' या चित्रपटात पोलिस बनल्यानंतर, आयुष्मान ईशान्येतील अनेक भागात गुप्त पोलिस बनणे आणि तेथील लोकांना भेडसावणाऱ्या भेदभावासारख्या गंभीर समस्या सोडवताना दिसणार आहे. (Ayushman Khurana latest news )

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कलाकारही प्रदेश आणि भाषेच्या आधारावर विभागलेल्या भारतावर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. ट्रेलर पाहून असे म्हणता येईल की, या चित्रपटातून दिग्दर्शक पुन्हा एकदा एक गंभीर विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना हसवणारा आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) यावेळी पडद्यावर एक गंभीर मुद्दा ठळकपणे मांडताना दिसणार आहे. (Anek Trailer Out news)

ईशान्य भारतातील लोकेशनवर चित्रपटाचे (Movie) शूटिंग करण्यात आले आहे. 'अनेक' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरीज आणि अनुभव सिन्हा यांच्या बनारस मीडिया वर्क्स यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे. 2019 च्या 'आर्टिकल 15' चित्रपटानंतर दिग्दर्शक अनुभव सिन्हासोबत आयुष्मानचा हा दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट 27 मे 2022 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

SCROLL FOR NEXT