Ankita Lokhande  Dainik Gomantak
मनोरंजन

Ankita Lokhande: अंकिता लोखंडे प्रेग्नंट?...लग्नाच्या एक वर्षांनंतर लगेच गोड बातमी...

अभिनेत्री अंकिता लोखंडे गरोदर असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे.

Rahul sadolikar

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे अलिकडे चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपासुन अंकिता लोखंडे प्रेग्नंट असल्याच्या बातम्या येत होत्या. तिने डिसेंबर २०२१ मध्ये विकी जैन याच्याशी लग्न केलं. अंकिता-विकीचा विवाहसोहळ्याची चर्चाही खूप झाली. अंकिताच्या लग्नाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. एक वर्ष पूर्ण होताच अंकिता गरोदर असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात बाहेर येऊ लागल्या आहेत. यावर आता स्वत: अंकिताच बोलली आहे.

काही दिवसांपासून अंकिता लोखंडेचे लूज कपड्यातले फोटो पाहुन चाहत्यांनी अंकिता प्रेग्नंट असल्याचे अंदाज बांधले होते. पण आता यावर अंकिता लोखंडेने स्पष्ट सांगितले आहे.

अंकिता म्हणते “आधी माझ्या लग्नाबद्दल चर्चा रंगू झाल्या , त्यानंतर प्रेग्नंन्सी आणि मग आमचा घटस्फोट होणार अशाही चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागल्या होत्या. पण या सगळ्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही. लोक त्यावर बोलतील, पण जोपर्यंत ते चांगले बोलतात तोपर्यंत ठीक आहे. जेव्हा ते चुकीचं गोष्टी बोलतील तेव्हा माझ्यावर त्याचा थोडा परिणाम होईल. जर ते माझ्या प्रेग्नंन्सीबद्दल बोलले तर मला खूप आनंद होतो, कारण मी नक्कीच एक दिवस गरोदर राहीन आणि हे मी स्वतः सगळ्यांना सांगेन.”

दरम्यान अंकिता लोखंडे सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींची अपडेट ती चाहत्यांना देत असते. विकी जैनबरोबर ती सुखात असल्याचंही तिने सांगितलं. त्यामुळे आत्ता ती गरोदर नाही आणि तिचा घटस्फोटही होणार नाहीये हे स्पष्ट करत तिने सर्व अफवांना पूर्णविराम लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT