Aditya Roy kapoor Ananya Panday Relationship Latest News  Dainik Gomantak
मनोरंजन

Ananya Panday: अनन्या अन् आदित्य रॉय कपूरच्या नात्यावरील चर्चांना...

Ananya Panday: याचे कारण सोशल मिडियावर शेअर केलेली एक पोस्ट ठरली आहे.

दैनिक गोमन्तक

Ananya Panday: बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आदित्य राय कपूर सध्या मोठ्या चर्चेत आहेत. दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. आता पून्हा एकदा या चर्चांना उधान आले आहे.

आदित्य आणि अनन्याच्या रिलेशनशीपच्या चर्चांना आत्ता उधान येण्याचे कारण अनन्याने सोशल मिडियावर शेअर केलेली एक पोस्ट ठरली आहे. स्पेनमध्ये आर्क्टिक मंकीचा एक कॉन्सर्ट एंन्जॉय करताना अनन्याने पोस्ट शेअर केली आहे.

दुसरीकडे आदित्य रॉय कपूरनेदेखील त्याच कनर्स्ट मधील पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. त्या दोघांनी केलेल्या पोस्टनंतर चाहत्यांनी दोन पोस्टमधील संबंध जोडत दोघेही एकत्र असल्याचा अंदाज लावला आहे. यावर आनंद व्यक्त आपले आवडते कपल असल्याचेदेखील म्हटले आहे.

दोघांनी एकाच वेळी एकाच ठिकाणची पोस्ट शेअर केल्यानंतर आता चाहत्यांनी पून्हा एकदा त्यांच्या नात्याबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. 2022मध्ये क्रिती सेनॉन च्या दिवाळी पार्टीनंतर या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांनी एकत्र कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावली तर त्यांच्या रिलेशनशीपबद्दल अफवा पसरल्या आहेत. आता दोघांनी केलेल्या पोस्टमुळे या चर्चांमध्ये भर पडली आहे.

दरम्यान, अनन्या पांडेने सध्या माझे लग्नाचे वय नसून माझे त्याबद्दल काही प्लॅन्सदेखील नाहीत असे एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले होते. अनन्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर आयुषमान खुराना ड्रीम गर्ल 2 मध्ये दिसून येणार आहे. तीचा हा आगामी चित्रपट 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तर आदित्य रॉय कपूर मेट्रो इन दिनों मध्ये सारा अलि खान बरोबर दिसून येणार आहे. त्याचा हा चित्रपट 29 मार्च 2024मध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT