Bollywood Actress Rakhi Sawant on Anant Ambani and Radhika Merchant's Ceremony Dainik Gomantak
मनोरंजन

Rakhi Sawant on Ambani's Ceremony: हजारो कोटी देऊनही रिहाना फाटके कपडे घालून आली; अंबानींनी प्री-वेडिंग सोहळ्याला बोलावलं नाही म्हणून राखीचा आगडोंब

Bollywood Actress Rakhi Sawant on Anant Ambani and Radhika Merchant Ceremony: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत कधी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर फॅशनच्या अनोख्या निवडींबद्दल चर्चेत असते.

Manish Jadhav

Rakhi Sawant on Anant Ambani Ceremony:

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत कधी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर फॅशनच्या अनोख्या निवडींबद्दल चर्चेत असते. लग्न आणि घटस्फोटामुळे काही काळ चर्चेत राहिलेल्या राखीने आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. यावेळी राखीने थेट प्रसिद्ध उद्यागोपती मुकेश अंबानींवर निशाणा साधला आहे. वास्तविक, सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला आमंत्रित न केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. तिने मुकेश अंबानींना अनंत अंबानीला आपल्या ताब्यात देण्याचे आवाहनही केले आहे.

राखी सावंत मुकेश अंबानी यांच्यावर भडकली

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणताना दिसत आहे की, ''तुम्ही एकॉन आणि रिहानासारख्या स्टार्संना प्री-वेडिंग सोहळ्याला का बोलावले? तुम्ही मला बोलावले असते तर मी डान्स करुन स्टेज मोडले असते, खुर्च्या आणि इतर वस्तूही मोडल्या असत्या. माझा डान्स तुम्ही अजून पाहिला नाही, अंबानी जी, मला वाटतं तुम्ही मला या सोहळ्याला बोलवायला हवं होतं, तुमचा खर्चही झाला नसता. त्यांना आमंत्रित करण्यासाठी तुम्ही हजार कोटी मोजले असतील. मात्र, रिहाना फाटलेले कपडे घालून आली. मी आले असते तर हॉट लूकमध्ये आले असते. मी अफलातून डान्स करते, साफ-सफाई करते, भांडी धुते.''

अनंतला माझ्या स्वाधीन करा

एवढ्यावरच न थांबता राखी पुढे म्हणाली की, ''अंबानी जी, तुम्ही मला हायर करा. अंबानी जी, तुमचा लेक अनंत मुकेश अंबानीला 5 दिवसांसाठी माझ्याकडे सोपवा. तुम्ही अनंतकडे पाहा त्याचे वजन किती वाढले आहे. तर दुसरीकडे तुमची सून राधिकाकडे पाहा ती किती कोमल दिसते. मी तिला झिरो फिगर करण्यासाठी मदत करेन. त्यानंतर, तुम्हीही खूश, तुमची सून राधिकाही खूश. अनंत कधीही हे विसरु शकणार नाही...''

दुसरीकडे, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याला बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, करीना कपूरसह अनेक दिग्गजांनी हाजेरी लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT