Pop Singer Rihanna  Dainik Gomantak
मनोरंजन

Anant Ambani Wedding: पॉप सिंगर रिहानासाठी अंबानींनी खर्च केले कोट्यावधी, भारतात पहिल्यांदाच करणार परफॉर्म

Anant Ambani Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडींग कार्यक्रम १ मार्च ते ३ मार्च यादम्यान गुजरातमधील जामनगर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Anant Ambani Wedding at jamnagar gujarat pre wedding pop singer rihanna paid crore

जगातील श्रीमंत कुटुंबापैकी एक असलेले अंबानी कुटुंब सध्या मोठ्या चर्चेत आहे. अनंत अंबानी यांच्या विवाहाच्यानिमित्ताने ते चर्चांचा भाग बनले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाआधी प्री-वेडींग कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध पॉप सिंगर आणि मॉडेल असणाऱ्या रिहानाला आमंत्रित केल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडींग कार्यक्रम १ मार्च ते ३ मार्च यादम्यान गुजरातमधील जामनगर येथे हा कार्यक्रम होणार आहे. रिहाना पहिल्यांदाच भारतात परफॉर्म करणार आहे. असे म्हटले जात आहे की अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नापूर्वी रिहानाच्या लाइव्ह परफॉर्मन्ससाठी स्वतःच्या खिशातून सुमारे 5 दशलक्ष डॉलर्स खर्च केले आहेत. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 41 कोटी रुपये आहे.

या कार्यक्रमातील हाय प्रोफाईल पाहुण्यांसाठी रिहाना सर्वात मोठे आकर्षणाचे केंद्र असणार आहे, जी तिच्या भव्य आणि अप्रतिम स्टेज शोसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. रिहानाचा पार्टनर A$AP रॉकी देखील तिच्यासोबत जामनगरमध्ये उपस्थित होता. घटनास्थळाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओ( Video) मध्ये काही ठिकाणी रिहाना तिच्या गाण्यांचे रिहर्सल करताना दिसत आहे.

दरम्यान, अंबानी कुटुंबाच्या या आनंदात जगभरातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय हाय प्रोफाइल व्यक्ती सहभागी होणार आहेत. बॉलीवूडचे( Bollywood ) अनेक कलाकारही या सोहळ्यात दिसणार आहेत, त्याची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT