Amruta Fadnavis Dainik Gomantak
मनोरंजन

अमृता फडणवीसांच नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अमृता फडणवीसांनी ट्विटरवरून पोस्टर शेअर करत दिली माहिती

दैनिक गोमन्तक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे सातत्याने चर्चेत असतात. सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असोत किंवा गाण्यांचे अल्बम,त्यामुळे त्या कायमच लाईमलाईटमध्ये चमकताना दिसतात. अमृता फडणवीसांचा मोठा चाहतावर्गही आहे. त्यातच आताच्या घडीला अमृता फडणवीस एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलं आहे. या गाण्याचं पोस्टर त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केलं आहे. त्याच नाव आहे 'वो तेरे प्यार का गम!'. त्यामुळे पुन्हा एकदा अमृता फडणवीसांच्या चर्चा सुरू झाल्या आहे. (Amruta Fadnavis New Song)

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी गाण्याचं पोस्टर शेअर करत लवकरच तुमच्या भेटीला येत आहे असं सांगितलं. वो तेरे प्यार का गम असे या गाण्याचे बोल आहेत. त्याच्या ट्विटर (Twitter) हॅण्डलवरून केलेल्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस म्हणतात, लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना. लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना! थँक यू सारेगामा ग्लोबल, कमिंग अप!

याअगोदर अमृता फडणवीस यांचे अनेक गाण्यांचे अल्बम्स प्रदर्शित झालेले आहेत. याआधी अमृता फडणवीसांनी शिवतांडव नृत्य, तेरी बन जाऊंगी अकॉस्टिक, ये नयन डरे डरे, तेरी मेरी फिरसे, मोरया रे, बेटिया प्राईड ऑफ नेशन, सड्डी गल्ली रेल गड्डी, कुणी म्हणाले, अंधार, तिला जगूद्या, पेटूनी उठू दे हि गाणी गायली आहेत. येणाऱ्या गाण्यांसाठी अमृता फडणवीसांचे चाहते प्रतीक्षेत आहेत. त्यांची काही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली तर काही ट्रोलही झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT