Amitabh Bachchan Jalsa Bungalow Bomb Threat Dainik Gomantak
मनोरंजन

Bomb Threat News: अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी, दिलजीत दोसांझही निशाण्यावर; मुंबईच्या महापौर कार्यालयाला ईमेल मिळाल्याने खळबळ

Amitabh Bachchan Jalsa Bungalow Bomb Threat: महानायक अमिताभ बच्चन आणि जुहू येथील त्यांचा प्रसिद्ध बंगला ‘जलसा’ संदर्भात एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली.

Manish Jadhav

Amitabh Bachchan Jalsa Bungalow Bomb Threat: महानायक अमिताभ बच्चन आणि जुहू येथील त्यांचा प्रसिद्ध बंगला ‘जलसा’ संदर्भात एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली. बिग बींच्या बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली असून, मुंबईच्या महापौर रितु तावडे यांना शुक्रवारी सकाळी आलेल्या ईमेलमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली.

मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) डीसीपी मनीष कलवानिया यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला असून, बीएमसी आणि महापौर कार्यालयाला मिळालेल्या या धमकीच्या ईमेलमध्ये केवळ अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यालाच नाही, तर खुद्द महापौर कार्यालय आणि प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या आगामी कॉन्सर्टलाही उडवण्याची धमकी देण्यात आली. दिलजीतचा ‘ऑरा इंडिया टूर’ कॉन्सर्ट आगामी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर आयोजित केला जाणार आहे.

मुंबईच्या महापौर यांना मिळालेल्या या धमकीच्या ईमेलमध्ये अमिताभ बच्चन, गायक दिलजीत दोसांझ, शाळा आणि महापौर कार्यालयाला थेट लक्ष्य करण्याचे म्हटले आहे. ‘Smith Johnson’ (smithjohnson6889@gmail.com) नावाच्या युजरकडून शुक्रवारी (23 ऑक्टोबर) सकाळी 11:31 वाजता हा मेल पाठवण्यात आला. ईमेलच्या सुरुवातीलाच “खालिस्तान झिंदाबाद” लिहून महापौर कार्यालयात दुपारी 3:11 वाजता आणि शाळांमध्ये दुपारी 1:11 वाजता स्फोट घडवण्याची धमकी देत “आपली मुले वाचवा” असे म्हटले आहे.

ईमेलमध्ये बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यावर 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान हल्ला करण्याचे सांगत, 1984च्या एका मुद्द्याचा उल्लेख करत गंभीर आरोप करण्यात आला. तसेच, 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवरील दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये बॉम्ब आणि आत्मघाती हल्ल्यात गायकाला संपवण्याची धमकी देण्यात आली. दिलजीतने कथितरीत्या बच्चन यांच्या पाया पडल्याचा राग यात व्यक्त करण्यात आला असून, मेलच्या शेवटी ‘खालिस्तान नॅशनल आर्मी’ आणि ‘बब्बर खालसा (परमार-कॅनाडा)’ या संघटनांचा व काही नावांचा उल्लेख करण्यात आला आहे.

या गंभीर प्रकारानंतर मुंबई पोलीस आणि सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, सायबर सेलच्या मदतीने या धमकीच्या मेलचा आयपी ॲड्रेस आणि डिजिटल स्त्रोत शोधण्याचे काम वेगाने सुरु आहे. एकीकडे मुंबईत सुरक्षेचा कडक पहारा बसवला गेला असताना, दुसरीकडे दिल्ली पोलिसांसमोरही मोठी अडचण निर्माण झाली आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत दिल्ली पोलिसांनी 30 ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये होणाऱ्या दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला. या हाय-प्रोफाइल धमक्यांमुळे पोलीस प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणा प्रचंड सतर्क झाली असून सर्व संबंधित ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GST Reforms From 1 November: 1 नोव्हेंबरपासून बदलणार GST चे नियम! नोंदणी होणार सोपी, रिफंड मिळणार फास्ट; मोदी सरकारची व्यापाऱ्यांना दिवाळी भेट

Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

Bambolim Traffic Diversion: गोव्यातील वाहनचालकांनो, लक्ष द्या! रविवारी पहाटे 1 ते 6 बांबोळीतील वाहतूक वळविणार; पर्यायी मार्ग जाहीर

Ration Card New Rule: 14 कोटी रेशन कार्डधारकांसाठी खूशखबर! आता रेशनसोबत मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; सरकारचा मोठा निर्णय

UN General Assembly: 'कारगिलमध्ये स्वतःच्या सैनिकांचे मृतदेह नाकारले', UNच्या मंचावर भारतानं घेतला पाकड्यांचा समाचार; धार्मिक स्वातंत्र्यावरुन थेट बाण VIDEO

SCROLL FOR NEXT