Amitabh Bachchan Birthday Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan: 'तुम्ही मला अजून किती रडवणार?' असं का म्हणाले बीग बी

Amitabh Bachchan: बीग बी भावूक झाल्यानंतर प्रेक्षकदेखील भावूक झाल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक

Amitabh Bachchan: हिंदी चित्रपटसृष्टीसाठी बीग बी म्हणजेच अमिताभ बच्चन म्हणजे अभिमानाची बाब आहे. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे तर अनेकजण त्यांना आपली प्रेरणा मानतात. आता ११ ऑक्टोबरला त्यांचा ८१ वा वाढदिवस आहे.

सध्या अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती सीझन १५ साठी शूटिंग करत आहे. आता सोनी टिव्हीने त्यांचा वाढदिवस हटके स्टाइल मध्ये सेलिब्रेट केला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये केबीसीच्या मंचावर मिळालेल्या सरप्राइजमुळे अमिताभ बच्चन भारावून गेले असून ते भावूक झाल्याचे दिसून येत आहेत. बीग बी भावूक झाल्यानंतर प्रेक्षकदेखील भावूक झाल्याचे दिसून येत आहे.

तुम्ही मला अजून किती रडवणार इथे आलेल्या अनेकांना रडताना मी समजूत घालत असतो.त्यांनी टिश्यू देत असतो. आज मात्र ती वेळ माझ्यावर आली. केबीसी( KBC )च्या मंचावर जेव्हा जेव्हा वाढदिवस साजरा होतो तो वाढदिवस( Birthday ) उत्तम असतो. असे म्हणत त्यांनी प्रेक्षक, चाहते आणि केबीसी ला सरप्राइज साठी आभार मानल्याचे दिसून आले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त अनेक सरप्राईज प्लॅन करण्यात आले आहेत. चिरंजीवीपासून ते विकी कौशल, विद्या बालन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि आर. माधवनसारख्या अनेक कलाकारांनी बिग बींना खास शुभेच्छा दिल्या आहेत. 'कौन बनेगा करोडपती 15' मध्ये, या सेलिब्रिटींचे संदेश अमिताभ बच्चन यांना दिले जातील.

आता हे सरप्राइज नक्की काय असणार आहे अशी उत्सुकता हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांना लागल्याचे सोशल मिडियावर दिसून येत आहे. हा एपिसोड ११ ऑक्टोबरला त्यांच्या वाढदिवशी रिलिज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT