Ira Khan Wedding Dainik Gomantak
मनोरंजन

Ira Khan Wedding: लेकीच्या लग्नासाठी आमिर अन् रिनाच्या घरी दिव्यांची रोशनाई

Ira Khan Wedding: दोघे महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करणार असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमन्तक

Ira Khan Wedding: गेल्या काही दिवसांपासून आमिर खानची मुलगी आइरा खानच्या लग्नाच्या चर्चा होताना दिसत आहे. आता जसजशी लग्नाची तारिख जवळ येत आहे, तसतशी आमिर खान आणि रिना दत्ताच्या घरी धामधुम पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आइरा खान आपल्या बॉयफ्रेंड नुपुर शिखरे सोबत लग्न करत आहे. दोघे 3 जानेवारी 2024 रोजी लग्न करणार असल्याचा खुलासा आमिर खानने नुकताच केला होता. आयरा आणि नुपूर लॉकडाऊनच्या काळात डेट करू लागले.

नुपूरने एका स्पोर्ट्स इव्हेंटदरम्यान आइराला प्रपोज केले होते आणि आयराने त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांची एंगेजमेंटही झाली होती. दोघेही महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आइरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्यांचा पारंपारिक महाराष्ट्रीयन केळवण सोहळा झाला आहे. आइराने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये नव्या नवरीची चमक स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, आइराची आई आणि आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता यांच्या घराची अप्रतिम झलक पाहायला मिळाली, दोघांची घरे मुलीच्या लग्नाआधी दिव्यांनी पूर्णपणे उजळल्याचे दिसून येत आहे.

असेही म्हटले जात आहे की, लग्नानंतर मुंबईमध्ये मोठे रिसेप्शनदेखील ठेवण्यात येणार आहे. आता आमिरच्या लेकीच्या लग्नात बॉलीवूडचे कोणते कलाकार हजेरी लावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT