Amir Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Amir Khan New Look: आमिर खान दिसला पूर्वी कधीही न दिसलेल्या लूकमध्ये... हा लूक नव्या चित्रपटासाठी?

अभिनेता आमिर खान पूर्वी कधीही न दिसलेल्या लूकमध्ये दिसला आहे, त्याचा लूक पाहुन चाहत्यांना प्रश्न पडला आहे कि हा त्याच्या नव्या चित्रपटाचा लूक नाही ना?

Rahul sadolikar

Amir Khan New Look बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान चित्रपटांच्या वेगळेपणासोबत आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखला जातो. आमिर खान 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात शेवटचा पडद्यावर दिसला होता. हा चित्रपट 2022 मध्ये ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर आमिरने अभिनयातून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. 

आता तो नुकताच दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात दिसला, जिथे त्याचा लूक पाहून सगळेच हैराण झाले. राखाडी रंगाचे केस आणि दाढीमध्ये दिसणारा आमिर(Amir Khan) खूपच बदललेला दिसत आहे. पंजाबी गायक जसबीर जस्सीसोबतचे त्याचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

ही काही पहिली वेळ नाही जेव्हा आमिर खानने आपल्या राखाडी केसांना अनोख्या स्टाईलने फ्लॉंट केले आहे. 'लाल सिंह चढ्ढा' फ्लॉप झाल्यानंतर आमिर परदेशात व्हेकेशनसाठी गेला होता, तिथून त्याचे काही फोटो समोर आले होते, तेव्हाही तो त्याच लूकमध्ये दिसला होता. 

यानंतर तो मुलीचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत मुलगी आयरा खानच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये अशाच लूकमध्ये दिसला. मात्र, यावेळी त्याची स्टाईल बदललेली दिसते. हा त्याच्या नव्या चित्रपटाचा लूक तर नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

आमिर खानने नुकतीच दिल्लीत एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याचे लेटेस्ट फोटो पाहिल्यानंतर काही लोकांना वाटले की तो लवकरच चित्रपटात काम करण्याचा विचार करत आहे. 

'लाल सिंह चढ्ढा' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र, जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला तेव्हा त्याचे सर्वत्र कौतुक झाले. एलएससीनंतर आमिरने अद्याप कोणत्याही प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.

जस्सीने आमिर खानसोबतच्या दिल्ली कार्यक्रमातील छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'दिल का अमीर, आमिर खान.' फोटोमध्ये दोघांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. 

आमिरच्या लेटेस्ट फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'महान माणूस, आमिर सर.' एका चाहत्याला आमिरच्या पुढील चित्रपटाबद्दल जाणून घ्यायचे होते आणि त्यांनी ट्विट केले, "सर का कमबॅक का कोई इरादा नहीं लग रहा है."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT