Amir Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Amir Khan: 'मी देखील याचा भाग असल्याने वाईट वाटते, लाज वाटते' मिस्टर परफेक्शनिस्टला होतोय पश्चाताप

Aamir Khan: आता आमिर खानने जाहीर माफी मागितली आहे, या माफी मागण्याचा संदर्भ काय आहे हे जाणून घेऊयात.

दैनिक गोमन्तक

Aamir Khan: संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अॅनिमल या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. चित्रपटाने जितकी कमाई केली तितकीच या चित्रपटाची चर्चाही झाली. या चित्रपटातील प्रमाणापेक्षा हिंसक दृश्यामुळे चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीकादेखील झाली. यामध्ये बॉ़लीवू़डमधील कलाकारांचादेखील समावेश आहे. आता आमिर खानने जाहीर माफी मागितली आहे, या माफी मागण्याचा संदर्भ काय आहे हे जाणून घेऊयात.

आमिर खानची एक्स वाईफ किरण राव यांनीदेखील अॅनिमल चित्रपटावर टीका केली होती. त्यावर अॅनिमलचे दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांनी उत्तरादाखल तिने आधी तिच्या पतीचे आमिर खानचे चित्रपट बघावेत. याबरोबरच दिग्दर्शकाने आमिर 'दिल' या चित्रपटातील काही दृश्यांचादेखील उल्लेख केला होता. या चित्रपटात आणि माधूरीने पती-पत्नीची भूमिका निभावली आहे आणि आमिरने त्यामध्ये मारहाण केल्याची भूमिका केली आहे. संदीप वंगा रेड्डी हे म्हणताना दिसतात की- त्यांनी आधी आपल्या पतीला विचारावे की, खंबे जैसी खड़ी है...या गाण्याविषयी विचारावे. ते काय होते. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे यावे.

आता आमिर खानने 'आज तक' या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, अभिनेत्याने माफी मागितली आहे. तो म्हणतो- ' हिंदी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर आपण गैरजबाबरदारीचे काम केले आहे. आपण ज्याप्रकारे मुलांना दाखवतो, ज्याप्रकारे मुलींना दाखवतो. वाईट गोष्टीदेखील चांगल्या आहेत अशाप्रकारे दाखवल्या जातात. मग लोकांना वाटते अरे वाईट मार्ग निवडल्याने चांगल्या गोष्टी होऊ शकतात. आपण चित्रपटात महिलांना वस्तू बनवतो, त्यांच्याकडे आपण माणूस म्हणून बघत नाही आणि मी देखील अशा चित्रपटांचा भाग आहे. मी आज जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा मला पश्चाताप होतो. मीदेखील याचा भाग असल्याने वाईट वाटते, लाज वाटते' असे देखील आमिर खानने म्हटले आहे.

दरम्यान, अॅनिमल चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी याला फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने पाहावे असे म्हटले आहे तर काहींनी भारतीय समाज चित्रपटाचे अनुकरण करतो त्यामुळे चित्रपट बनवताना समाजाप्रति आपली काही जबाबदारी असते. चित्रपटात दाखवलेल्या हिंसेचे प्रमाण जास्त असल्याचे पाहायला मिळाल्याने अॅनिमल चित्रपटाला टिकेचा सामना करावा लागला आहे. असे असले तरी बॉक्स ऑफीसवर चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT