Sunny Deol - Amir Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Sunny Deol - Amir Khan : आता सनी देओल आणि आमिर खान येणार या चित्रपटासाठी एकत्र...

अभिनेता आमिर खान आणि सनी देओल आता एका आगामी चित्रपटासाठी एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Rahul sadolikar

Amir Khan - Sunny Deol together in upcoming Movie : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान आता त्याच्या आगामी चित्रपटात सनी देओलसोबत दिसणार असल्याची माहिती मिळत आहे.

गदर 2 च्या यशानंतर आता सनी देओल आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासोबत काम करणार आहे.

घायल घातकचे दिग्दर्शक

'घायल', 'घातक', 'दामिनी' सारखे जबरदस्त चित्रपट बनवणारा राजकुमार संतोषी पुन्हा एकदा सनी देओलसोबत काम करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानही काम करणार आहे.

आमिर खान प्रोडक्शन आणि सनी देओलने सोशल मीडियावर एक नोट शेअर करून माहिती दिली आहे. त्याच्या पुढील प्रोजेक्टचे शीर्षक काय आहे ते सांगितले. या प्रोजेक्टबाबत आपण खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

आमिर खानने शेअर केली नोट

आमिर खान आणि सनी देओलने जारी केलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, 'मी आणि आमिर खान प्रॉडक्शनची संपूर्ण टीम हे जाहीर करताना खूप उत्साहित आणि आनंदी आहे की, राजकुमार संतोषी दिग्दर्शित आणि सनी देओल अभिनीत आमचा पुढचा चित्रपट लाहोर आहे, तो 1947 आहे. 

अशा सक्षम आणि तेजस्वी सनी देओल आणि माझा आवडता दिग्दर्शक राज संतोषी यांच्यासोबत आम्ही काम करणार आहोत. या नवीन प्रवासासाठी आम्हाला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.

चित्रपटाची घोषणा

नुकतीच बातमी आली होती की, आमिर खान आणि सनी देओल एकत्र एक चित्रपट करत आहेत. 

एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की एका OTT प्लॅटफॉर्मने त्याचे खास हक्क विकत घेण्यासाठी 95 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. 

16 ते 19 ऑक्‍टोबर दरम्यान त्याची घोषणा होऊ शकते, असेही सांगण्यात आले. मात्र 3 ऑक्टोबरलाच त्याची घोषणा करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

SCROLL FOR NEXT