Amazon Prime New Web Series Dainik Gomantak
मनोरंजन

Amazon Prime New Web Series : अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या आगामी ओरिजनल सिरीज ’जुबिली’चा ट्रेलर प्रदर्शित

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या आगामी वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे

Rahul sadolikar

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज आपली आगामी ओरिजनल सिरीज ’जुबली’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. 10 एपिसोडचा फिक्शनल ड्रामा असलेल्या या सिरीजचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केले आहे तर, याची निर्मिती सौमिक सेन आणि मोटवानी यांनी केली आहे.

दरम्यान, रिलायंस एंटरटेनमेंट आणि फँटम स्टुडिओच्या सहयोगाने एंडोलन फिल्म्सद्वारा निर्मित या सिरीजची पटकथा आणि संवाद अतुल सभरवाल यांनी लिहिले आहेत तसेच, यामध्ये अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेला सदाबहार साउंडट्रॅक आहे.

अशातच, या शोमध्ये प्रसेनजीत चॅटर्जी, अदिती राव हैदरी, अपारशक्ती खुराना, वामिका गब्बी, सिद्धांत गुप्ता, नंदिश संधू आणि राम कपूरसह श्वेता बसु प्रसाद, अरुण गोविल, सुखमणी लांबा, आर्य भट्ट, नरोत्तम बैन, आलोक अरोरा यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व कलाकारांची टीम आहे. यात सुहानी पोपली मुख्य भूमिकेत आहे.

भारत आणि २४० देश आणि प्रदेशांमधील प्राइम मेंबर्ससाठी ७ एप्रिल रोजी भाग एक (एक ते पाच भाग) स्ट्रीम करू शकतात, तर भाग २ (भाग सहा ते दहा) पुढील आठवड्यात १४ एप्रिल रोजी प्रदर्शित केले जातील.

’जुबली’चा हा आकर्षक ट्रेलर प्रेक्षकांना भारतीय सिनेमातील सुवर्णकाळाच्या मोहक जगाची ओळख करून देतो. बॉलीवूडमधील सुवर्णकाळाच्या पार्श्‍वभूमीवर आधारित, 'जुबली' एक असा ड्रामा आहे .

एक स्टुडिओ बॉस, त्याची फिल्म-स्टार पत्नी, एक विश्वासू सहकारी, एक उगवता तारा, एक भोळी मुलगी आणि एक शरणार्थी आणि त्यांच्याद्वारा खेळल्या जाणाऱ्या जुगार ची कथा आहे. आपली स्वप्ने, महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा पाठलाग करण्यासाठी हे सगळे पुन्हा तयार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT