South Superstar Allu Arjun Dainik Gomantak
मनोरंजन

Allu Arjun Upcoming Movie: अल्लू अर्जुन नव्या चित्रपटात पुन्हा दिसणार या अभिनेत्रीसोबत...

सुपरस्टार अल्लू अर्जुनने नुकतीच एका चित्रपटाची घोषणा केली आहे

Rahul sadolikar

Allu Arjun Upcoming Movie: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याने आपल्या चाहत्यांना एक गिफ्ट दिले आहे. पुष्पा: द रुलच्या शूटिंग दरम्यान, अल्लू अर्जुनने आता त्याचा नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा एक मोठा चित्रपट असणार आहे. 

दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन आता चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध निर्माता भूषण कुमार आणि लोकप्रिय दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्यासोबतच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. साहजिकच त्याचे चाहते आतुरतेने या नव्या चित्रपटाबाबतीत उत्सुक आहेत.

रश्मिका मंदान्ना सोबत दिग्दर्शक सुकुमारच्या पुष्पाच्या यशानंतर प्रचंड लोकप्रियता मिळवणारा अल्लू अर्जुन आता निर्माता भूषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटानिमित्य नुकतीच तिघांची भेट झाली. 

अल्लू अर्जुनची मुख्य भूमीका असणाऱ्या या नवीन चित्रपटाचे शूटींग लवकरच सुरू होईल, चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज फिल्म्स प्रॉडक्शने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुन स्टारर चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज फिल्म्स प्रोडक्शन आणि भद्रकाली पिक्चर्सद्वारे केली जाणार आहे.

अल्लू अर्जुन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'पुष्पा: द रुल'चे शूटिंग करत आहे. सुकुमार दिग्दर्शित हा सिक्वेल या वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये झळकणार आहे.

आता, पुष्पा 2 ची पहिली झलक 8 एप्रिल रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या येत आहेत. अल्लू अर्जुनचे चाहते 8 एप्रिलची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण याच दिवशी त्याचा वाढदिवस आहे.

 सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित, पुष्पा हा दोन भागांचा अॅक्शन ड्रामा आहे ज्यामध्ये अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. अल्लू अर्जुनचा पुष्पराज आणि फहाद फासिलचा भंवर सिंग शेखावत यांच्यातील संघर्ष पहिल्या भागात संपला आहे म्हणजे त्याला आतातरी ब्रेक लागला आहे

Mythri Movie Makers आणि Muttamsetty Media द्वारे निर्मित, हा चित्रपट पुष्पा राज नावाच्या एका मजुराच्या प्रवासाची गोष्ट दाखवतो या प्रवासात तो लाल चंदनाची तस्करी करणारा सिंडिकेटचा प्रमुख बनतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT