Pushpa 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Allu Arjun & Rashmika Mandanna: 'Pushpa 2' शूटिंगचा शुभारंभ 'या' दिवसापासून होणार सुरु

अल्लू अर्जुन लवकरच पुष्पा 2 च्या शुटिंगला लवकरच सुरुवात करणार आहे.

दैनिक गोमन्तक

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' (Pushpa) चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. त्यामुळेच प्रेक्षक त्याच्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत होते. ही आतुरता आता संपली असून पुष्पा या चित्रपटाच्या सीक्वल अर्थात 'पुष्पा द रुल'शी संबंधित एक अपडेट्स समोर आली आहे. अल्लू अर्जुन लवकरच पुष्पा 2 च्या शुटिंगला लवकरच सुरुवात करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुन लवकरच पुष्पा 2 च्या शुटिंगची सुरुवात करणार आहे. ऑक्टोबरच्या मध्यापासून अल्लू अर्जुन "पुष्पा 2" च्या शुटिंगची सुरुवात करेल आणि लवकरच त्याचा नवा लुक प्रेक्षकांसमोर येणार आहे.यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे.

पुष्पा: द राइजच्या सिक्वेलची तयारी जोरात सुरू आहे. गेल्या महिन्यात निर्मात्यांनी चित्रपटाच्या पूजा समारंभाचे आयोजन केले होते. मात्र तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या संपामुळे पुष्पा: द रुलचे शूटिंग सुरू होऊ शकले नाही.

यापूर्वी अशी बातमी आली होती की साऊथची सुपरस्टार अभिनेत्री सई पल्लवी पुष्पा पार्ट 2 मध्ये एंट्री झाली आहे. या चित्रपटातील आदिवासी मुलीच्या भूमिकेसाठी तिच्याशी संपर्क साधण्यात आला असून तिने या भूमिकेसाठी संमती दिली आहे. ती लवकरच शूटिंग सुरू करणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पुष्पाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. असे म्हटले जाते की भारतीय सिनेमातील आतापर्यंतच्या सर्वात महागड्या दृश्यांमध्ये त्याचे अॅक्शन सीन्स शूट केले जातील. हा चित्रपट 2023 च्या मध्ये रिलीज होऊ शकतो.

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, यावेळी हा चित्रपट केवळ 10 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय भाषा देखील समाविष्ट असेल. याशिवाय, निर्माते प्रमोशन बजेट देखील पाच पट वाढवू शकतात. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी रविशंकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार संपूर्ण चित्रपटाच्या निर्मितीसाठी 500 कोटी रुपये लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT