Lata Mangeshkar  Dainik Gomantak
मनोरंजन

सर्व सामान्यांना घेता येणार लता दीदींचे अंत्यदर्शन

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

दैनिक गोमन्तक

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या मधुर गाण्यांच्या माध्यमातून ठसा उमटविणाऱ्या जेष्ठ प्रसिध्द गायिका लता मंगेशकर यांचे निधन (Lata Mangeshkar passes away) झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादिदींना कोरोनासोबतच न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुबंईतील (Mumbai) ब्रीच कॅंडी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. (Lata Mangeshkar Death News Update)

दिदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्यप्रदेशमधील इंदोर शहरात झाला होता. त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर शास्त्रीय गायक होते. लतादिदी दिनानाथ मंगेशकर यांच्या सर्वात जेष्ठ कन्या होत्या. लतादिदी यांच्या पाठीवर आशा, उषा, मीना आणि ह्रदयनाथ ही लहान भावंडे आहेत. दिदींनी पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी (Movie) पाश्वगायन केले होते.

रविवारी सकाळी ८.१२ वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साडे बारा वाजता लता मंगेशकर यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्कवर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. होईल. दरम्यान, सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण बहु-अवयव निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या २९ दिवसांपासून ती कोरोनाशी लढत होत्या. लता मंगेशकर लवकर बरे व्हाव्यात यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात यज्ञ करण्यात आले, पण तरीही स्वरा नाइटिंगेलला जीवनाची लढाई जिंकता आली नाही आणि तिने जगाचा निरोप घेतला. शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकरांचं पार्थिव हलवण्यात आले आहे. लता दीदींच्या अंतिम संस्कारासाठी लाखो चाहते दर्शन घेण्यासाठी जमले आहेत. सर्व सामान्यांना लता दीदींचे दर्शन घेता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT