Alia Bhatt Photo  Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt: आलियाने स्वत:लाच बार्बी म्हणत शेअर केली पोस्ट; चाहते म्हणाले ही बार्बी तर...

Alia Bhatt: हॉलीवूडच्या 'हार्ट ऑफ स्टोन' या डेब्यू फिल्ममध्ये ती आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

Alia Bhatt: बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता मात्र तिने शेअर केलेल्या फोटोंची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

सध्या आलिया नेटफ्लिक्सचा टुडुम 2023 हा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी ब्राझीलला पोहोचली आहे. येथील फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. गुलाबी आऊटफीट मध्ये तिने वेगवेगळ्या पोजमध्ये काढलेले फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र या सगळयात तिने या फोटोंना दिलेले कॅप्शन मात्र हटके आहे.

तिने स्वत:लाच बार्बी म्हटले आहे. कॅप्शन देताना तिने म्हटले आहे की, 'धीस बार्बी इज जेट लॅग्ड'. यावर आता वेगवेगळ्या मजेशीर कंमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. इरा दुबे कमेंट करुन म्हणते- 'धीस बार्बी इज मॅजिक'.

एका युजरने म्हटले आहे की, या बार्बीपेक्षा कोणतीही बार्बी सुंदर असू शकत नाही. तर एका युजरने म्हटले आहे की, गुडीयाला काय झालं? थोडक्यात आलियाने आपल्या नटखट पोझनी चाहत्यांना कमेंट करण्यासाठी भाग पाडले आहे.

दरम्यान , नजीकच्या भविष्यकाळात हॉलीवूडच्या हार्ट ऑफ स्टोन या डेब्यू फिल्ममध्ये ती आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसणार आहे. आलियाशिवाय या फिल्ममध्ये गाल गाडोट ( Gal Gadot ) आणि जेमी डोरनन ( Jamie Dornan ) देखील दिसून येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT