Alia Bhatt wish Neetu Kapoor a b'day wishes  Instagram
मनोरंजन

Neetu kapoor B'Day: सुंदर फोटो शेअर करत आलिया भट्टने सासूबाईंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Neetu kapoor B'Day Celebration: नीतू कपूर कुटुंबियांसोबत लंडनमध्ये वाढदिवस साजरा करत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची सासु नीतु कपूर यांचा आज वाढदिवस आहे. सोशल मिडीयावर नीतु कपूर यांना अनेक बॉलिवूड कलाकार वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर त्यांच्या लाडक्या सुनेने एक खास फोटो शेअर करत नीतू कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Neetu kapoor B'Day Special News)

आलिया भट्टने (Alia Bhatt) तिच्या हळदी समारंभातील एक सुदंर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने नीतू कपूर यांच्यासाठी खास बर्थ डे मॅसेज सुद्धा लिहिला आहे. या फोटोत आलिया आणि नीतू कपूर दोघींनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहे. आलियाला हळद लावतांना दिसत आहे. आलियाने फोटो (Photo) शेअर करत लिहल की,”सर्वात सुंदर मनाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझी सासू, मैत्रीण आणि लवकरच होणाऱ्या आजीला खूप सारं प्रेम”

alia Bhatt wish to neetu kapoor

दरम्यान, नीतू कपूर कुटुंबियांसोबत त्यांचा वाढदिवस लंडनमध्ये (london) साजरा करत आहे. रणबीरच्या (Ranbir) बहिणीने म्हणजेच रिद्धीमाने नीतू यांच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे काही खास क्षण सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. ‘हैपिएस्ट बर्थडे लाइफलाइन’ असं म्हणत रिद्धीमानेही आईला शुभेच्छा दिल्या आहेत. नीतू कपूर यांनी नुकतच ‘जुग जुग जियो’ या चित्रपटातून बऱ्याच वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवन आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

SCROLL FOR NEXT