Alia Bhatt Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt Viral Video : अलिया भट्टच्या या कृतीने सोशल मिडीयावर होतोय कौतुकाचा वर्षाव..व्हिडीओ पाहाच

अभिनेत्री आलिया भट्टची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे कारण तिचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Rahul sadolikar

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटासाठी प्रसिद्ध आलिया लवकरच प्रमोशन टूर सुरू करणार आहे. 

आलिया आईच्या भूमीकेत

आलिया भट्ट सध्या तिची मुलगी राहाच्या आईच्या भूमीकेत व्यस्त आहे. तिच्या व्यस्त वेळापत्रकात, आलिया गुरुवारी रात्री तिची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टसोबत मुंबई शहरात दिसली. पण यादरम्यान असे काही घडले, ज्याने सर्वांचीच मनं जिंकली.

आलियाने स्वत:च चप्पल उचलली

गुरुवारी आलिया भट्ट एका पापाराझीला मदत करताना दिसली ज्याने तिचे फोटो क्लिक करताना त्याची चप्पल पायातून निघाली. यावेळी आलियाने स्वतः त्याची चप्पल उचलली आणि त्याला घालायला दिली. आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या कृतीने तिचे चाहते प्रभावित झाले आहेत.

सोशल मिडीयावर प्रतिक्रिया

व्हिडिओ शेअर करत व्हायरल भयानीने लिहिले की, 'आलिया भट्ट म्हणाली - ही चप्पल कोणाची आहे?' सोशल मीडिया वापरकर्त्यांनी क्लिपवर प्रतिक्रिया दिली, त्यापैकी एकाने लिहिले की, "चप्पल को कायमची फ्रेम केली जाईल." दुसरा म्हणाला, 'ती खूप गोड आणि विनम्र आहे, दुसरी कोणती अभिनेत्री असती तर तिने असे केले नसते, त्यामुळे आलिया माझी आवडती आहे.' तिसरा म्हणाला, 'त्याला खूप गोड वाटते. खरोखर जमिनीशी जोडलेली.

गरोदरपणात चिंताग्रस्त

बुधवारी आलिया भट्टने नवी दिल्लीत Amazon प्राइम व्हिडिओच्या 'मिशन स्टार्ट अब' या मालिकेच्या लॉन्चिंगला हजेरी लावली. तिच्या अॅड-ए-मम्मा ब्रँडबद्दल बोलताना, अभिनेत्रीने गरोदरपणात चिंताग्रस्त असल्याबद्दल सांगितले आणि म्हणाली, 'मी 2022 मध्ये बाळाची अपेक्षा करत होते, आणि मी माझा वॉर्डरोब व्यवस्थित करण्याचा विचार करत होते. माझ्यासाठी तिथे कुठलेही कपडे नव्हते.

माझ्यासाठी कपडे, पुढच्या काही महिन्यांत माझे शरीर कसे असेल याची मला चिंता होती. मग, मी माझ्या वॉर्डरोबमध्ये बदल करायला सुरुवात केली. आणि मग मला अड-ए-मम्मा मिळाला.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT