Alia Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt चे घरातील प्रायव्हेट फोटो व्हायरल, मुंबई पोलिसांकडे केली कारवाईची मागणी

Alia Bhatt: पापाराजींनी आज सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे फोटो काढण्यासाठी एका न्यूज पोर्टलचे दोन लोक गुपचूप तिच्या घरी पोहोचले.

Manish Jadhav

Alia Bhatt: पापाराजींनी आज सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे फोटो काढण्यासाठी एका न्यूज पोर्टलचे दोन लोक गुपचूप तिच्या घरी पोहोचले. त्यांनी आलियाचे फोटो तिच्या परवानगीशिवाय क्लिक केले आणि सोशल मीडियावर शेअर केले. याची माहिती खुद्द आलिया भट्टने दिली आहे.

आलियाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट शेअर केली. विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये तिने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) टॅग केले. या दोन लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची विनंती तिने केली आहे. जाणून घेऊया या संपूर्ण घटनेबद्दल...

आलियाने लिहिले...

इन्स्टाग्राम स्टोरीजवर या घटनेची माहिती देताना आलियाने लिहिले की, "खरंच? मी माझ्या घरी होते, माझ्या लिव्हिंग रुममध्ये दुपारी बसले होते. तेव्हा मला जाणवले की, कोणीतरी मला पाहत आहे. मी पहिल्यांदा इकडे-तिकडे पाहिले. मात्र, शेजारच्या इमारतीत मला कॅमेरे असलेले दोन लोक दिसले (हॉटेलच्या छतावर). कोणत्या जगात अशा प्रकारचे कृत्य न्याय्य आहे, आणि त्याला परवानगी आहे का? हे एखाद्याच्या गोपनीयतेवर आक्रमण आहे." यासोबत आलियाने Etimes ने शेअर केलेले फोटो देखील पोस्ट केले आहेत.

दुसरीकडे, आलिया भट्टच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, तिला नुकताच 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील तिच्या शानदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटासाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

तसेच, आलिया भट्ट हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पांढर्‍या रंगाची साडी परिधान करुन अगदी साध्या लूकमध्ये पोहोचली होती. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यात ती ज्येष्ठ अभिनेत्री रेखासोबत दिसत आहे. आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती पुढे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT