Alia Bhatt  Dainik Gomantak
मनोरंजन

Alia-Ranbir Wedding: रणबीरसोबत लग्नाच्या चर्चांवर आलियाचा पूर्णविराम

अखेर आलियाने रणबीरसोबत लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आलिया आणि रणबीर 17 एप्रिल रोजी लग्नबधणात अडकणार आहेत. लग्नाबाबत आलिया आणि रणबीरनं अजून कोणतेही अधिकृत घोषणा सोशल मिडियावर (Social Media) केलेली नाही. पण आता लग्नाच्या या चर्चांना आलियाने पूर्णविराम दिला आहे. (Alia-Ranbir Wedding latest News)

निकुंज लोटिया हा एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. त्याने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने कबीर सिंग या चित्रपटामधील एक सीन रिक्रिएट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'Me on 17th April' आणि ब्रोकन हार्ट इमोजी दिले आहे. या व्हिडीओवर (Video) आलिया भट्टने 'डेड' अशी रिअॅक्शन दिली आहे. त्यामुळे आता आलियाने लग्नाच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे, असं नेटकरी म्हणत आहेत.

* नीतू कपूर यांनी याआधी दिली होती प्रतिक्रिया
नीतू कपूर यांना एका मुलाखतीमध्ये रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तारिख विचारली होती, तेव्हा त्यांनी 'देवालाच माहिती'अशी प्रतिक्रिया दिली होती. पुढे त्या म्हणाल्या ते कधी लग्न करतील ते माहित नाही पण माझी इच्छा आहे की त्यांनी लवकरच लग्नगाठ बांधावी. आलिया खूप चांगली मुलगी आहे. त्या दोघांची छान जोडी होऊ शकते.' रणबीर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामध्ये (Movie) एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता या दोघांचे लग्न कधी होणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT