Alia-Ranbir Wedding Dainik Gomantak
मनोरंजन

Alia-Ranbir Wedding: रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नात कोण-कोण येणार?

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची यादी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल्सपैकी एक रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. वृत्तानुसार, हे जोडपे 17 एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्ना संबंधित अनेक चर्चा सुरू आहेत. पण, रणबीरच्या कुटुंबीयांकडून लग्नाबाबत कोणतेही नियोजन सुरू नसल्याचे वारंवार संकेत दिले जात आहेत. दरम्यान आलिया आणि रणबीरच्या लग्नात कोण येणार याची माहिती समोर आली आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या महिन्याच्या 17 तारखेला आरके हाऊसमध्ये लग्न करणार आहेत. 13 एप्रिलपासूनच लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. आलिया-रणबीरच्या लग्नातील पाहुण्यांची यादी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खान, वरुण धवन, संजय लीला भन्साळी, झोया अख्तर, करण जोहर, मनीष मल्होत्रा, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, सैफ अली खान आणि अर्जुन कपूर यांच्यासह सर्व बॉलिवूड (Bollywood) स्टार्स या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. .

रणबीर आणि आलिया दोघेही सध्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. दोघांनी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र काम केले आहे. याशिवाय आलिया आगामी चित्रपट (Movie) 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा' आणि 'डार्लिंग्स' तर रणबीर 'शमशेरा' चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT