Alia Bhatt  Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt: गंगुबाई काठियावाडीमधील पहिलं 'ढोलिडा' गाणं रिलीज

धोलिडा या गाण्यात आलिया भट्टने अतिशय सुंदर नृत्य केला आहे.

दैनिक गोमन्तक

आलिया भट्ट स्टारर गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील ढोलिडा हे गाण रिलीज झाले आहे. या गाण्यातील अलियाने केलेल्या नृत्याची (Dance) प्रचंड कौतुक होत आहे. हा गरबा नृत्य आहे. गाण्याची सुरुवात संजय लीला भन्सारी यांच्या आयकाॅनिक गुजराती संगीताने होते. गाण जसजसे या गाण्याच्या (Song) वाढत्या ठेक्यासह आलियाच्या (Alia Bhatt) नृत्याचा देखिला वेग वाढतो. कमाठीपुरामध्ये मैत्रिणींसोबत डान्स करतानाचे आलियाचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत. सोशल मिडियावर (Social Media) आलियाच्या नृत्याची प्रशंसा जोरदार सुरू आहे. (Gangubai Kathiawadi first Song Dholida)

आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहूप्रतीक्षित गंगूबाई काठीयावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटातील पहिल गाण रिलीज (Release) झाले आहे. या गाण्यात आलिया पहिल्यांदा पडद्यावर गरबा डान्स करतांना दिसत आहे. ढोलिडा हे गाण्याचे शीर्षक आहे. या गाण्यात आलियाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान करून स्वॅगमध्ये डान्स (Dance) करतांना दिसत आहे. या गाण्यात आलिया गुलाल उधळताना दिसत आहे. आलियाने या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या गाण्यात चंडी आणि चामुंडा या देवतांची नावे घेण्यात आली आहे.

ढोलीडा हे गाणे संजय लीला भन्सारी यांनी संगीतबद्ध केले आहे. गाणी कुमार यांनी लिहिली आहेत. हे गाणं जानवी जान्हवी श्रीमानकर आणि शैल हाडा यांनी गायले आहे. या गाण्यांचे कोरीयोग्राफ कृती महेश यांनी केले आहे. यूट्यूबवर आलियाच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT