Alia Bhatt Delivery Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt Pregnancy: ‘या’ महिन्यात कपूर घराण्यात होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन!

Alia Bhatt Delivery Date: कपूर घरात लवकरच होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

दैनिक गोमन्तक

सध्या बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची सेसळ मिडीयावर चर्चा सुरु आहे. आलिया आणि रणबीर लवकरच आई-बाबा होणार आहेत. नुकतेच आलियाने एक फोटोशूट पोस्ट केला आहे. ज्यात तिने आपला बेबी बंप फ्लाँट केला आहे. सध्या आलियाच्या डिलिव्हरी डेटची चर्चा सुरु झाली आहे. आलियाने बेबी बंप दाखवल्यापासून तिचे चाहते आता तिच्या बाळाचे आगमन वीट पाहत असुन वेगवेगळे तर्क लावत आहेत. आलिया प्रेग्नेंसीशिवाय तिच्या ‘डार्लिंग्स’ (Darlings) आणि ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटामुळेही चर्चेत आहे.

या दरम्यान आलियाच्या प्रेग्नेंसीबाबत नवीन बातम्या समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट चार महिन्यांची गरोदर आहे आणि डिसेंबरच्या अखेरीस ती आपल्या बाळाला जन्म देणार आहे. आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या लग्नाच्या तीन महिन्यांतच चाहत्यांना गुडन्यूज मिळली आहे. आलिया आणि रणबीरची आनंदाची बातमी ऐकून त्यांचे चाहते देखील खुश झाले आहेत.

सध्या रणबीर आणि संपूर्ण कपूर कुटुंबीय आलियाची काळजी घेतांना दिसत आहेत. स्वतः आलिया देखील तिच्या तब्येतीची खूप काळजी घेत आहे. वेळोवेळी तिची कोरोना टेस्ट देखील करून घेत असते. अलिकडेच त्यांनी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. यानिमित्ताने आलियाने पहिल्यांदाच तिचा बेबी बंप फ्लाँट केला. यादरम्यान ती रणवीरसोबत ब्राऊन शॉर्ट ड्रेसमध्ये पोज देताना दिसली. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

रणबीर-आलिया प्रथमच एकत्र दिसणार

आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची बातमी ऐकून चाहतेही खूप उत्सुक आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच आलिया भट्टचा चित्रपट ‘डार्लिंग्स’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. आता रणबीर आणि आलियाचा आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ पुढच्या महिन्यात सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या दोघांचा एकत्र असा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरूनच दोघांची प्रेमकहाणी सुरु झाली होती.

नुकताच रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. पण हा चित्रपट काही खास कमाई करू शकला नाही. आता अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रणबीरसाठी लकी ठरेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, चैतन्य अक्किनेनी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT