Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh Khan: पाकिस्तानच्या अली खानला शाहरुखच्या अभिनयावर शंका,म्हणाला; क.. क..किरण..

Shahrukh Khan: शाहरुखने त्याच्या त्या डर चित्रपटामध्ये अशाप्रकारचा अभिनय का केला होता याचं उत्तर मला अजुनही मिळालेले नाही.

दैनिक गोमन्तक

Shahrukh Khan: शाहरुख खान त्याच्या पठाण सिनेमामुळे मागच्या काही दिवसात बराच चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटावरुन आणि बेशरम गाण्यातील दिपिकाच्या कपड्यांवरुन वादही झाले आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी याला मोठा विरोध केला होता.

त्याचबरोबर पठाण चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिकाही अनेक संघटनांनी घेतल्याचे दिसून आले आहे.आता यामध्ये पाकिस्तानी अभिनेता अली खानची भर पडली आहे. त्याने शाहरुख सारख्या ओव्हर अॅक्टिंग करणाऱ्या अभिनेत्याचा कंटाळा कसा येत नाही असा प्रश्न नेटकऱ्यांना विचारला आहे. तो नेहमीच ओव्हरअॅक्टींग करतो आणि त्याचे चाहतेही त्याला प्रतिसाद देतात. तो नेहमीच क..क....क...किरण असं करतो आणि त्याच्या अभिनयाला पसंती मिळते, चाहतेही तो अभिनय वर्षानुवर्षे पाहतात.

शाहरुखने त्याच्या त्या डर चित्रपटामध्ये अशाप्रकारचा अभिनय का केला होता याचं उत्तर मला अजुनही मिळालेले नाही. मी ज्यावेळी त्याला भेटलो होतो तेव्हा तो मला फारच वेगळा वाटला होता. मात्र अली खानची ही टिप्पनी नेटकऱ्यांनी पसंतीस उतरली नाही. नेटकऱ्यांनी अली खानला ट्रोल केले आहे.

दरम्यान, डॉन 2 या चित्रपटात अली खान आणि शाहरुख खान( Shahrukh Khan ) यांनी एकत्र काम केले आहे. शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार असून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT