Akshay Kumar's Video Dainik Gomantak
मनोरंजन

Akshay Kumar's Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेतील अक्षयकुमारचा व्हिडिओ पाहिलात का?

वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाचा फर्स्ट लुक आला समोर

Akshay Nirmale

Akshay Kumar's Video: अभिनेता अक्षयकुमार आता मराठी चित्रपटांमध्ये पदापर्ण करणार आहे. विशेष म्हणजे त्याचे हे पदार्पण ग्रँड ठरणार आहे. याचे कारण आहे, तो करत असलेली भुमिका. अक्षयने मंगळवारी त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भुमिकेत दिसून येतो. (Akshay Kumar's Upcoming films teaser)

अक्षयच्या या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे 'वेडात मराठे वीर दौडले सात.' अक्षयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फर्स्टलूकमध्ये अक्षयकुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत दिसून येतो. त्याने या व्हिडिओसोबत 'जय भवानी, जय शिवाजी' अशी कॅप्शन दिली आहे. अक्षयच्या या नव्या लुक आणि भुमिकेची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. या भुमिकेमुळे अक्षय चर्चेत आला आहे.

यापुर्वी अक्षयने या चित्रपटाच्या शुटिंगची माहिती देत शिवाजी महाराजांचा फोटो शेअर केला होता. या फोटोतील काचेत अक्षयची झलक पाहायला मिळत होती. अक्षयने म्हटले होते की, मराठी चित्रपट 'वेडात मराठे वीर दौडले सात' चे शुटिंग सुरू झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची भुमिका साकारणे माझ्यासाठी अत्यंत सौभाग्याचे आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2023 च्या दिवाळीत येणार आहे. हा चित्रपट पॅन इंडिया असणार आहे, तो हिंदीसह तमिळ, तेलगु या भाषांमध्येही पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात जय दुधाने, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, नवाब खान आणि प्रवीण तरडे हे कलाकार प्रमुख भुमिकांमध्ये आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT