Akshay Kumar Tiger Shroff Dainik Gomantak
मनोरंजन

Akshay Kumar :"बडे मिया छोटे मिया"चे पुढचे शूटींग आता स्कॉटलंडमध्ये

'बडे मिया छोटे मिया' या चित्रपटाचे पुढचे शूटींग आता स्कॉटलंडमध्ये होणार आहे

Rahul sadolikar

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची चर्चा सर्वत्र होत आहे. आता या सिनेमाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग भारतात पूर्ण झाले असून पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटाचे पुढील शेड्यूल स्कॉटलंडमध्ये शूट केले जाईल. यासाठी अक्षय आणि टायगरसह संपूर्ण टीम 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या पुढील शेड्यूलची तयारी करत आहे.

या चित्रपटात बॉलीवूडचे दोन सर्वात मोठे अ‍ॅक्शन हिरो, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांना एकत्र पाहायला मिळणार असून, हे कॉम्बिनेशन प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तसेच, पृथ्वीराज सुकुमारन देखील या सिनेमाद्वारा खलनायकाच्या व्यक्तीरेखेतून आपले अभिनय कौशल्य दाखवत दर्शकांच्या भेटीला येणार आहेत.

अलीकडेच, निर्माता जॅकी भगनानी, टायगर श्रॉफ यांनी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली.वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा प्रोड्युस्ड, वाशू भगनानी आणि पूजा एंटरटेनमेंटद्वारा प्रस्तुत आणि अली अब्बास जफरद्वारा लिखित आणि दिग्दर्शीत तसेच, एएझेड फिल्मच्या सहयोगाने पूजा एंटरटेनमेंटचा अ‍ॅक्शन एंटरटेनर 'बड़े मियां छोटे मियां'हा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT