OMG2 Poster Release Dainik Gomantak
मनोरंजन

OMG 2 Poster Release: शिवशंकराच्या अवतारात अक्षयकुमार चाहते म्हणाले, जर हिंदूत्वासोबत काही...

Akshay Kumar: 'ओमजी 2' हा चित्रपट 11ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Akshay Kumar: बॉलीवूडमध्ये खिलाडी अशी ओळख मिळालेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार आहे. अक्षय कुमारने आपल्या आत्तापर्यंतच्या आपल्या अभिनयाच्या कारकिर्दित अनेक हीट चित्रपटात काम केले आहे. मात्र अलिकडे त्याच्या चित्रपटांची जादू चित्रपटगृहात दिसेनाशी झाली आहे.

आता अक्षय कुमार OMG2 या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. अभिनेत्याने OMG2 चे एक पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये तो जबरदस्त लूकमध्ये दिसून येत आहे.

भगवान शिवशंकराच्या अवतारात अक्षय कुमार असे हे पोस्टर असून चाहते त्याच्या या लूकवर प्रचंड खूश झाले आहेत. लांब जटा, कपाळावर भस्म, रुद्राक्षाच्या माळा आणि आकाशाकडे नजर अशा अवतारात अक्षय कुमार शिवशंकरच दिसत आहेत.

अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर शेअर करत फक्त काही दिवसातच ओमजी 2 हा चित्रपट 11ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणार असून लवकरच चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

त्याच्या या पोस्टवर काहींनी आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी हिंदूच्या भावनेला ठेच पोहचेल अशी दृश्ये चित्रपटात असतील तर वाईट परिणाम होतील असेही म्हटले आहे.

दरम्यान, सुरुवातीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज होणारा हा चित्रपट आता थिएटर मध्ये रिलिज होणार आहे. ज्यावेळी ओमजी 2 रिलिज होईल तेव्हाच गदर २देखील रिलज होणार असल्याने दोन्ही चित्रपटात कॅल्श होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला प्रेम देणार आणि कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे ,कारण गदर आणि ओमजी या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.

ओमजी 2 मध्ये अक्षय कुमार शिवाय अभिनेत्री यामी गौतम आणि प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT