Akshay Kumar's new movie OMG 2  Instagram /@akshaykumar
मनोरंजन

OMG 2 Teaser: 'OMG 2' चा टीझर पाहिल्यानंतर चाहते म्हणाले अक्षयच्या करिअरला...

OMG 2 Teaser: देव आहे की नाही याचे प्रमाण माणूस आस्तिक किंवा नास्तिक बनून देऊ शकतो

दैनिक गोमन्तक

OMG 2 Teaser:  बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट 'ओएमजी 2' मुळे मोठ्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकचा एक पोस्टर रिलिज झाले होते. त्यावेळी त्याच्या नवीन अवताराचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केले होते.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ओएमजी २ मुळे मोठ्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकचा एक पोस्टर रिलिज झाले होते. त्यावेळी त्याच्या नवीन अवताराचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केले होते.

आता OMG 2 चा ट्रेलर रिलिज झाला आहे. काही मिनिटांच्या या ट्रेलरने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. पंकज त्रिपाठींच्या आवाजाने या ट्रेलरची सुरुवात झालेली पाहायला मिळते. देव आहे की नाही याचे प्रमाण माणूस आस्तिक असो किंवा नास्तिक बनून देऊ शकतो मात्र देव आपल्या बनवलेल्या माणसांमध्ये कधीही भेदभाव नाही करत असे पंकज त्रिपाठी म्हणताना दिसत आहे. लांब जटांमध्ये अक्षय कुमार दिसून येत आहे.

ओएमजी 2 हा 2012 मध्ये आलेल्या ओएमजीचा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसत आहे तर ओएमजी 2 मध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत दिसून येत आहे. हा चित्रपट अक्षय कुमारच्या करिअरला नवीन उभारी देईल असे म्हटले जात आहे. ओएमजी 2 चे पोस्टर रिलिज झाल्यापासूनच अक्षय कुमारचे कौतुक होताना दिसत आहे. आता श्रावणाच्या मुहुर्तावर रिलिज केलेल्या टीझरने पून्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

दरम्यान, सुरुवातीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज होणारा हा चित्रपट आता 11ऑगस्टला थिएटर मध्ये रिलिज होणार आहे. ज्यावेळी ओमजी 2 रिलिज होईल तेव्हाच गदर 2 देखील रिलज होणार असल्याने दोन्ही चित्रपटात कॅल्श होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला प्रेम देणार आणि कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे , कारण गदर आणि ओएमजी या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT