Akshay Kumar Citizenship Dainik Gomantak
मनोरंजन

Akshay Kumar Citizenship : मी आता भारतीय नागरीकच... अक्षय कुमारने सोशल मिडीयावर दिला कागदपत्रांसह पुरावा...

अभिनेता अक्षय कुमारने 15 ऑगस्टच्या दिवशी भारतीय नागरीकत्व पुन्हा एकदा मिळवले आहे.

Rahul sadolikar

अभिनेता अक्षय कुमारला त्याच्या कॅनेडियन नागरीकत्वासाठी सोशल मिडीयावर बऱ्याचदा ट्रोल करण्यात आले ;पण आता अक्षयने भारतीय नागरीकत्व पुन्हा मिळवले आहे.

अक्षय कुमार आता भारतीय नागरिक आहे. त्याचा पुरावा त्यांनी ट्विटरवर त्यांच्या अधिकृत सरकारी कागदपत्रांच्या फोटोंसह शेअर केला. “दिल और नागरिकत्व, दोनो हिंदुस्तानी. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद,” अशा कॅप्शनसह अक्षयने ही माहिती दिली आहे.

अक्षयचे नागरीकत्व

अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. अक्षयने यापूर्वी सांगितले होते की त्याने 2019 मध्ये भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता, परंतु कोविडमुळे प्रक्रियेस विलंब झाला. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त, अक्षयने त्याच्या चाहत्यांसह रोमांचक बातम्या शेअर करण्यासाठी X, (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाते). डॉक्युमेंटचा फोटो शेअर करत लिहिले, “दिल और सिटीजनशीप, दोनो हिंदुस्तानी. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!"

अक्षयची ती मुलाखत

आजतकला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला होता की, जेव्हा लोक त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वामागचे कारण न समजता काही बोलतील तेव्हा त्याला वाईट वाटेल. “भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे… मी जे काही कमावले आहे, जे काही मिळवले आहे ते येथून आहे. आणि मी नशीबवान आहे की मला परत देण्याची संधी मिळाली. जेव्हा लोक काहीही नकळत बोलतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटते...”

अक्षय सध्या त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या OMG 2 च्या यशाने आनंद घेत आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

ओ माय गॉडची चर्चा

सध्या अक्षयच्या ओ माय गॉडची चर्चा सोशल मिडीयावर सुरू आहे. हा चित्रपट सनी देओलच्या गदरला टक्कर देऊ शकला नसला तरी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम हेही कलाकार महत्त्वाच्या भूमीकेत दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT