Akshay Kumar  Dainik Gomantak
मनोरंजन

अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद

दैनिक गोमन्तक

अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट आज होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. 'बच्चन पांडे'च्या चर्चा खूप दिवसांपासून सुरू होत्या. हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेप्रेमी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. 'बच्चन पांडे' पाहिल्यानंतर अनेक लोकांनी याबाबत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. काहींना हा चित्रपट खूप आवडला आहे, तर काहींसाठी तो कंटाळवाणा ठरला आहे.

अनेक लोकांनी ट्वीट करत आपले मत मांडले. काही लोकांना चित्रपटात कॉमेडी आणि अ‍ॅक्शनचा उत्तम मिलाफ आहे असे वाटले, तर काहींना हा चित्रपट अजिबात आवडला नाही. 'बच्चन पांडे' हा चित्रपट दिग्दर्शक फरहाद सामजीने बनवला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) क्रिती सेनन, अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग, प्रतीक बब्बर यांच्यासह इतर स्टार्सनी काम केले आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेकर्सनी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या आहेत. चित्रपट (Movie) प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांच्या नजरा आता बॉक्स ऑफिस (Box Office) कलेक्शनकडे आहेत. अनुपम खेरचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट 'बच्चन पांडे' ला टक्कर देऊ शकतो, असे अनेक लोकांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT