Bade Miyan Chote Miyan Dainik Gomantak
मनोरंजन

Bade Miyan Chote Miyan: अक्षय - टायगरचा बडे मियाँ छोटे मियाँ 2024 च्या ईदला रिलीज होणार...

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या चाहत्यांना आता 2024 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Rahul sadolikar

Bade Miyan Chote Miyan: वाशू आणि जॅकी भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंट निर्मित 'बडे मियाँ छोटे मियाँ' या बहुप्रतिक्षित अॅक्शन फिल्ममध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची जोडी पहिल्यांदाच  पडद्यावर दिसणार आहे आणि त्याचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. 

EID 2024 मध्ये हा चित्रपट ब्लॉकबस्टर रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाल्यापासुन त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.

शुक्रवारी, खिलाडी कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटातील हाय-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्सचे फोटो पोस्ट केले आणि त्याला कॅप्शन दिले, "ईद 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये भेटू #BadeMiyanChoteMiyan #BadeMiyanChoteMiyanEid2024" अक्षय आणि टायगर अॅक्शनने भरलेले आहेत, दोघेही बंदूक घेऊन लढायला तयार आहेत. दोघांचेही चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.

अक्षय कुमारचा कमेंट सेक्शन उत्साहाने आणि शुभेच्छांनी भरलेला होता. एका चाहत्याने लिहिले, "खिलाडी... बस या आता... ईद 2024 ची वाट नाही बघू शकत. (फायर इमोजी)", दुसर्‍याने लिहिले, "ईदी लेकर आरहे ही बडे मियाँ और छोटे मियाँ", आणि तिसऱ्याने लिहिले, "वाट बघू शकत नाही"

बडे मिया छोटे मियामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसह, पृथ्वीराज सुकुरामन, हे मुख्य भूमीकेत दिसतील याशिवाय चित्रपटात मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' EID 2024 ला पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT