Drishyam 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Ajay Devgan: 'दृश्यम 2' मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक

अक्षय खन्नाही दिसणार दमदार भुमिकेत; विजय साळगावकर जुनी रहस्ये उलगडणार?

गोमन्तक डिजिटल टीम

Ajay Devgan: अभिनेता अजय देवगण याने त्याच्या आगामी 'दृश्यम 2' या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये अजय देवगण टफ लूकमध्ये दिसत असून त्याच्या हातात फावडे देखील आहे. हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी रीलीज होणार आहे.

'दृश्यम'च्या यशानंतर अजय देवगण आता 'दृश्यम 2' घेऊन आला आहे. काही दिवसांपुर्वीच अजयने या चित्रपटाचा रीकॉल टीझर शेअर केला होता. त्यात दृश्यमच्या पहिल्या भागात घडलेली कहानी थोडक्यात दाखवली होती. त्याला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर चित्रपटातील तब्बूचा लूकदेखील समोर आला होता.

त्यानंतर चित्रपटातील अक्षय खन्नाचाही लूक समोर आला होता. आणि आता मुख्य भुमिकेतील विजय साळगावकर म्हणजे अजय देवगणचा लूक समोर आला आहे. अजयने हे पोस्टर शेअर करताना लिहिले आहे की, तुमच्या नजरेसमोर काय सुरू आहे हे महत्वाचे नाही, तुम्ही काय पाहत आहात हे महत्वाचे आहे.

या चित्रपटात अक्षय खन्नाचीही महत्वाची भूमिका असणार आहे. त्याच्या फर्स्ट लूकनेही अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अक्षयने स्वतःचा लूक सोशल मीडियातून शेअर कॅप्शन दिली होती की, शत्रुला पराभूत करण्याची संधी बऱ्याचदा शत्रु स्वतःच देत असतो.

दरम्यान, तब्बूची भूमिका या चित्रपटात छोटी असेल, असे वाटते. या चित्रपटात श्रिया सरन आणि इशिता दत्ता यांच्याही भूमिका असणार आहेत. 'दृश्यम 2' हा मूळ मल्याळम 'दृश्यम 2' चा रीमेक आहे. मूळ चित्रपटात अभिनेते मोहनलाल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. अजय देवगणचा पहिला 'दृश्यम' देखील मोहनलाल यांच्या मूळ 'दृश्यम'चाच रीमेक होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT