Nysa and Ajay Devgn Instagram
मनोरंजन

सिंघमची मुलगी 'न्यासा' करणार बॉलीवुडमध्ये पदार्पण?

अजय देवगणची (Ajay Devgn) मुलगी न्यासा (Nysa) अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता 'अजय देवगण' सध्या त्याच्या रन-वे-34 (Runway 34) या चित्रपटामुळे सोशल मिडियावर चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, बोमन इराणी, रकुल प्रीत सिंग, अंगिरा धर आणि आकांक्षा सिंग हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक स्टार किड्स अॅक्टिंग क्षेत्रात करिअर करतां दिसत आहेत. अजय देवगणची मुलगी न्यासा ही देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. अजयने न्यासाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.

अजयला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते, 'न्यासा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे का?' यावर अजय म्हणाला, 'अभिनय क्षेत्रात काम करायची सध्या न्यासाला इच्छा नाही. न्यासा या क्षेत्रात करिअर करेल की नाही, हे मला माहित नाही.' न्यासा ही सध्या 18 वर्षाची आहे. ती शिक्षणासाठी सिंगापूर येथे गेली होती. सध्या ती स्वित्झर्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं न्यासाचे काही फोटो (Photo) सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोवर अनेकांनी लाईक्स आणि कॅमेटचा वर्षाव केला आहे.

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण 1999 मध्ये लग्न बंधनात अडकले. त्यांची लव्ह स्टोरी देखील फिल्मी स्टाइलपेक्षा कमी नाही. 'हलचल' चित्रपटाच्या (Movie) शुटींगवेळी या दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर चार वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांचेही लग्न झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

SCROLL FOR NEXT